जळगाव। तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवार 10 जुन रोजी सावदा, चाळिसगाव, पाचोरा व मुक्ताईनगर विभागातील 6 उपकेंद्रावरील वीज पुरवठा बंद राहणार आहे. तरी सर्व सन्माननीय ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. देखभाल व दुरुस्तीच्या महत्वाच्या तांत्रिक कामांकरीता विदयुत पुरवठा बंद राहणार आहे. कामे वेळेच्या आत पुर्ण झाल्यास विदयुत पुरवठा त्वरीत सुरु करण्यात येईल.
नमूद केलेल्या परिसराचा वीज पुरवठा बंद राहणार
सावदा विभाग – 33/11 केव्ही किनगाव उपकेंद्रातून – सर्व 11 केव्ही वाहिन्या (जसे सर्व 11 केव्ही किनगाव शेती, वाघझिरा शेती, डांभूर्णी शिवार शेती, डांभूर्णी शेती(जुनी), वाघझिरा गावठाण, किनगाव गावठाण या वाहिन्या) आणि 33/11 केव्ही चिंचोली या उपकेंद्रातून निघणा-या सर्व 11 केव्ही वाहिन्या (जसे सर्व 11 केव्ही उंटावद शेती, आडगाव शेती, चिंचोली शेती, शेवाळे शेती, मनुदेवी शेती, चिंचोली गावठाण या वाहिन्या) सकाळी 09:00 ते दुपारी 05.00 या वेळेत बंद राहतील. चाळीसगाव विभाग – 132 केव्ही चाळीसगाव उपकेंद्रातून – 11 केव्ही डेअरी वाहिनी चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड , डेअरी परिसर , तहसील परिसर , दयानंद हॉटेल चा परिसर (सकाळी 10.00 ते दुपारी 05.00), पाचोरा विभाग – 11 केव्ही भडगांव व 11 केव्ही एक्सप्रेस (सकाळी 10.00 ते दुपारी 04.00), मुक्ताईनगर विभाग – 33 केव्ही पुर्णाळ (सकाळी 10.00 ते दुपारी 04.00) याप्रमाणे राहणार आहे.