जिल्ह्यातून तीघे बेपत्ता

0

धुळे । शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील तीन जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसात नोंदविण्यात आल्या आहेत. तामथरे ता.शिंदखेडा येथे राहणार्‍या प्रमोद शंकर चौधरी (वय 24) यांनी शिंदखेडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सुनिता शंकर चौधरी ही महिला 4 रोजी रात्री 10 वाजता परिवारासह घरात झोपलेली होती.

मात्र सकाळी दिसून आली नाही. रात्रीतून ती निघून गेली आहे. शिंदखेडा पोलिस तिचा शोध घेत आहेत.दोंडाईच्या शहरातील पटेल कॉलनीत राहणारी आशा प्रकाश जैन (वय 33) दि.5 रोजी संध्याकाळी राहत्या घरुन कोणालाही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी तिचा पती प्रकाश दिपचंद यांनी दोंडाईचा पोलिसात मिसिंगची खबर दिली आहे. खर्दे बु. धनाई नगर ता.शिरपूर येथे राहणारा किरण संजय माळी (वय 18) हा विद्यार्थी गुरव सरांकडे क्लासला जातो असे सांगुन घरातुन निघाला. मात्र तो घरी परतलाच नाही.