धुळे। शहर आणि जिल्ह्यातून चौघे जण बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या घटनांची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे. यात दोन मुलींचा तर दोन तरुणांचा समावेश आहे. कोडींबा एकनाथ गवळी (25) रा.तिघी ता.धुळे हा तरुण 27 मे रोजी सकाळी 9 वाजता एमआडीसीत कामाला जातो असे सांगून घरातून गेला तो परत आलाच नाही. त्यामुळे सोनु एकनाथ गवळी याने दिलेल्या खबरीवरुन मोहाडी पोलिसात मिसींगची नोंद करण्यात आली आहे.
परिक्षेसाठी गेलेली तरूणी गायब
तसेच वेल्हाणे देवाचे ता.धुळे येथील रहिवाशी असलेली डिंपल मयुर जाधव ही 22 वर्षीय तरुणी दि. 28 मे रोजी सकाळी 11.30 वाजता धुळे येथे मावस बहिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली मात्र ती बेपत्ता झाली. रचितकुमार वसंत वाघ याने दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. तर धुळे शहरातील देवपूर भागातील खाटीकवाडा येथून शिरीन ईस्माईल शहा (18) ही तरुणी 28 रोजी सकाळी 10 वाजता रहात्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघुन गेली. याप्रकरणी युसूफ ईस्माईल शहा यांनी देवपूर पोलिसात हरवल्याची तक्रार दिली आहे. चौथी घटना दोंडाईचात घडली. वैभव बापू पाटील (19) रा.मंदाणे हा तरुण दि. 27 मे रोजी पेपर देण्यासाठी म्हणून दोंडाईचा बसस्थानकावर गेला होता. तो परत आला नाही म्हणून मिसींगची तक्रार वडील बापू बुधा पाटील यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिली आहे.