जिल्ह्यातून 93 गुन्हेगार हद्दपार ; अवैध दारुच्या गुन्ह्यात 111 जण अटकेत

0

जिल्हा पोलीस दलाची निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर कारवाई

जळगाव : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगार तसेच उपद्रवी असलेल्या 93 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून अवैध दारुचे 106 गुन्हे दाखल करण्यात आले असून 111 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 3 हजार 624 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 21 सप्टेबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. पहिल्याच दिवशी पोलिसांनी जिल्ह्यात अवैध दारु विक्री होणाजया 24 ठिकाणी धाडी टाकून 24 जणांना अटक केली. यात देशी,विदेशी व गावठी दारुचा समावेश आहे. त्याशिवाय जामीनपात्र, अजामीनपात्र वारंट, समन्स व खावटीचे 1 हजार 582 वारंटची बजावणी करण्यात आली असून 889 वारंटची बजावणी झालेली नाही. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी याबाबतचा आढावा घेतला.दरम्यान, निवडणुकीच्या काळात पोलिसांच्या सुट्टयाही रद्द केल्या जाणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील सिमावर्ती भागातील पोलीस अधीक्षकांशी चर्चा करुन घ्यावयाची खबरदारीबाबत नियोजन करण्यात आले.