जळगाव-जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढु लागली आहे. रविवारी दिवसभरात नव्याने ५११ रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक २६७ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात भुसावळातील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण ६४ हजार ५४३ असे रूग्ण आढळुन आले आहे. त्यापैकी ५८ हजार ५३५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण १२, भुसावळ ३१, अमळनेर १, चोपडा ३८, धरणगाव १६, यावल २, एरंडोल ७, जामनेर ७८, रावेर ६, पारोळा ६, चाळीसगाव १२, मुक्ताईनगर २१, बोदवड १४, असे एकुण ५११ रूग्ण आढळून आले आहे.