जळगाव: जिल्ह्यात ९७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून एकुण कोरोबाधीतांची संख्या २८५४ एवढी झाली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी एकूण ९७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात भडगाव २७ , जळगाव शहर-७; जळगाव ग्रामीण-३; भुसावळ-५; एरंडोल-१२; चाळीसगाव-२; पाचोरा-९; यावल-४;चोपडा-६; जामनेर १०, अमळनेर-६; धरणगाव-५ व रावेर १ असे कोरोनाबाधीत आढळुन आले आहेत.
दोन जणांचा कोरोनाने मृत्यु
दरम्यान जिल्ह्यातील दोन रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला अाहे. यात जळगाव शहरातील २८ वर्षाचा पुरूष आणि यावल तालुक्यातील
६८ वर्षांच्या वृध्देचा समावेश अाहे. जिल्ह्यात कारणाने एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २०९ वर पोहचली आहे, अशी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.