जिल्ह्यात ईदनिमित्त सामुहिक नमाज पठण

0

धुळे। शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी रमजान ईद सणाचा उत्साह साजरा करण्यात आला. धुळे शहरात पांझरा नदीकाठी व इतरत्र असलेल्या इदगाह मैदानांवर मुस्लीम बांधवांनीसामुहिक नमाज पठण केले. जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे सर्व मुस्लीम बांधवांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करीत पवित्र रमजान ईदच्याशुभेच्छा देण्यात आल्या.

शहरात मुस्लिम बांधवानी पवित्र रमजान महिन्याच्या रोजा समाप्ती दि.26 रोजी ईद सणाने झाली. ईदनिमित्त पांझरा नदीकाठी असलेल्या ईदगाहसह मशिदीत नमाज पठण करण्यात आली. शहरात सर्वत्र ईद शांततेत आणि उत्साहात साजरी झाली. सकाळी 8 वाजेच्या दरम्यान लहान पुलाजवळील असलेल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण केले. तेथे देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिम बांधवांनीही नमाज पठणानंतर परस्परांना भेटून ईदच्या शुभकामना व्यक्त केल्या. तसेच पांझरा नदीच्या दक्षिणेला असलेल्या मशिदीतही अनेक मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली.

ईदगाह मैदान गर्दीने फुलले: यावेळी पोलीस प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, अप्पर पोलीसअधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रमेशसिंह परदेशी, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक चंद्रकांत गवळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल वडनेरे यांनी तर जिल्हा प्रशासनाच्यावतीने अप्पर तहसिलदार ज्योती देवरे यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून बाजारपेठा गर्दीने गजबजलेल्या दिसल्या. विविध वस्तू खरेदी केल्या गेल्या. कपडे, दागिने, फळे, पादत्राणे, सुकामेवा आदींची प्रचंड उलाढाल झाली. धुळे शहरातील सुमारे 125 मशिदींवर गर्दी दिसून आली. देवपूर, चाळीसगाव-मालेगाव रोड, वडजाई रोड गर्दीने ओसंडून भरलेले दिसले. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

ऐकमेकांना शुभेच्छा
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सणानिमित्त निजामपूर ईदगाह मैदनावर मुस्लीम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून तसेच एकमेकांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला. यावेळी मौलाना मुफ्ती अ. अलीय यांनी ईद या विषयावर प्रवचन केले. सकाळी 8.30 वाजता सामुहिक प्रार्थना (दुआ) केली. यानंतर सर्व मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यानंतर मुस्लीम बांधवांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला. तसेच आपल्या हिंदू बांधवांना देखील शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले होते. ईदगाह मैदनावर निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पटेल, संजय खैरनार, रघूवीर खारकर, राजेश बागुल, प्रकाश पाटील, बाजीराव पगारे, नाना धनगर आदींनी उपस्थि द त राहून शुभेच्छा दिल्यात. ईदच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांसाठी झुले, खेळण्याची दुकाने थाटण्यात आली होती.

रमजान उपवासाची सांगता
शिंदखेडा । शहरासह तालूक्यात मुस्लीम बांधवांनी रमजान ईद उत्साहात व आनंदात साजरी केली. शहरात हिंदू बांधवांनी देखील मूसलमान बांधवांना ईदच्या शुभेच्छा देवून हिंदू -मुस्लीम एकतेचा संदेश दिला. मुसलमान बांधवांनी येथील मश्जिदित जावून नमाज अदा केली. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या उपवासाची सांगता करण्यात आली. शहरातील नगर पंचायतीचे गटनेते व माजी प.स.सभापती प्रा.सुरेश देसले, रावसाहेब अनिल वानखेडे,नगराध्यक्षा मथूराबाई मराठे, उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख,नगरसेवक दिपक देसले, राष्ट्रवादिचे अरूण देसले,राकेश महिरे,स्वप्निल सोनार, विविध सामाजिक संघटना यांच्यातर्फे मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमीत्त शुभेच्छा दिल्या.

पिंपळनेर येथे हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन
पिंपळनेर-मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान निमीत्त ईदगाह पाड्यावर सकाळी मुस्लिम समाज बांधवांकडुन सार्वजनिक नमाज पठण करण्यात आले. नमाज पठण झाल्या नंतर पिंपळनेर येथील हिंदु बांधवांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पष्प देवुन शुभेच्छा दिल्या यावेळी सहाय्यक निरिक्षक सुनिल भाबड,अप्पर तहसिलदार यशवंत सुयॅवंशी, उपसरपंच योगेश नेरकर,पंचायत समिती सभापती संजय ठाकरे,ललीत पाटील, गजेंद्र कोतकर, पांडुरंग सुयॅवंशी,ग्रामपंचायत सदस्य राजु शिरसाठ, जे.टी.नगरकर,हाजी जुहुर जहागिरदार युवक काँग्रेस चे योगेश बधाण, हाजी जावेद सैयद, नौशाद सैयद, आदी मुस्लिम समाजाचे बांधव उपस्थित होते.