जळगाव – जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या २०२० इतकी झाली असुन आज नव्याने १३५ रूग्ण आढळुन आले आहे. यात जळगाव शहरात २१, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ११, अमळनेर १६, चोपडा २३, पाचोरा ३, भडगाव १, धरणगाव ८, यावल ६, एरंडोल ८, जामनेर १२, रावेर ८, पारोळा १३ अशा रूग्णांचा समावेश आहे.