जळगावात सर्वाधिक 65 रूग्ण आढळले
जळगाव- जिल्ह्यात आज नव्याने 253 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले असुन जळगाव शहरात सर्वाधिक 65 रुग्णांचा त्यात समावेश आहे. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 724 झाली आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 65 , जळगाव ग्रामीण 13, भुसावळ 20, अमळनेर 1, चोपडा 12, पाचोरा 8, धरणगाव 9, यावल 2, एरंडोल 3, जामनेर 30, रावेर 21, पारोळा 12 , चाळीसगाव 26, मुक्ताईनगर 19, बोदवड 12 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 6 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रावेर तालुक्यातील 2, जामनेर, पाचोरा, यावल आणि चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.