जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट: आज रेकॉर्ड ब्रेक रुग्ण आढळले

0

जळगाव शहरात सर्वाधिक ३६९ नविन रूग्ण

जळगाव – जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने नवा विक्रम केला असून तब्बल १०६३ रूग्ण नव्याने बाधित झाले आहे. यात सर्वाधिक जळगाव शहरातील ३६९ रूग्णांचा समावेश आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या हि जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब समजली जात आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या ३० हजार ७४९ एवढी झाली आहे. सर्वाधिक ३६९ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. आज दिवसभरात ९ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ३६९ , जळगाव ग्रामीण ८४, भुसावळ ३१, अमळनेर ९९, चोपडा ६७, पाचोरा ४६, भडगाव ३१, धरणगाव २२ , यावल ११, एरंडोल ७७, जामनेर ५०, रावेर १९, पारोळा १७, चाळीसगाव ८१, मुक्ताईनगर २५, बोदवड १९, इतर जिल्ह्यातील १५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर चार तर एरंडोल, चोपडा, अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.