जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यासोबतच दैनंदीन कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्युचाही आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात २४ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांची आत्तापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान आज नव्याने ११४७ रूग्ण बाधित झाले असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची परिस्थीती अत्यंत गंभीर होत आहे. आत्तापर्यंत एकुण रूग्णांची संख्या १ लाख १०४२४ इतकी झाली असुन ९७ हजार ३६२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज आढळुन आलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर २३६, जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ १५३, अमळनेर ३८, चोपडा १२४, पाचोरा २५, भडगाव १९, धरणगाव ३८, यावल ४३, एरंडोल ७२, जामनेर ५५, रावेर १३९, पारोळा २७, चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर ४१, बोदवड ३६ आणि इतर जिल्ह्यातील १२ रूग्ण असे एकुण ११४७ रूग्ण आढळुन आले आहेत. तर १२०९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
बाधित २४ रूग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आज २४ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक ५, पाचोरा तालुक्यात ४, जळगाव शहरात ३, जामनेर तालुक्यात ३, भडगाव, भुसावळ, जळगाव आणि धरणगाव तालुक्यात प्रत्येकी २ तर बोदवड तालुक्यात १ अशा एकुण २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
सारी व इतर आजारामुळे १८ जणांचा मृत्यू
कोरोना बाधितांच्या मृत्युचा आकडा कमी होत नाही तोच आता सारी आणि न्युमोनिया, कोरोना संशयित आणि कोरोना नंतर मृत्यू पावलेल्यांची संख्या १८ असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.