जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढली

0

जळगाव – गेल्या दोन आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट ही जिल्ह्यासाठी दिलासादायक होती. मात्र आज पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ झाली असुन ४४३ नविन रूग्ण दिवसभरात आढळून आले आहेत. यात सर्वाधिक १४१ रूग्ण मुक्ताईनगर तालुक्यात आढळून आले आहे.

जिल्ह्यात गुरूवारी नव्याने ४४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. एकूण रुग्णसंख्या ५० हजार ६६५ झाली असून दिवसभरात ७ बाधितांचा मृत्यू
झाला आहे. दुसरीकडे ४६५ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात गुरूवारी नव्याने ४४३ रुग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहर ६३, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ २०, अमळनेर २२, चोपडा १४, पाचोरा ४, भडगाव ६, धरणगाव ३, यावल ७, एरंडोल ७, जामनेर ११३, रावेर १३,
पारोळा ३, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर १४१, व इतर जिल्ह्यातील ३ याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत. आज दिवसभरात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात जळगाव शहर ३, जामनेर तालुक्यातील २, भुसावळ, आणि एरंडोल तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.