जिल्ह्यात ठिकठिकाणी ईफ्तार पार्टींचे आयोजन

0

वरखेडी। रोजा उपवास मनुष्याला शांती व स्वतावर नियत्रण ठेवायला शिकवत शिकविते, अशी माहिती जमिअते उलमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी यांनी पवित्र रमजान महिन्याचे महत्व सागून वरखेडी भोकरी या गावातील हिंदू मुस्लीम बांधवाच्या एकते बाबत विचार मांडले व दोन्ही गावात शांतता सलोख्याचे वातावरण व भाईचारा हा एक आदर्श घेण्यासारखा असून तो आसाच टिकून राहावा आशी आपेक्षा करून मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्याचे अवचीत्य साधून शुक्रवार 23 जून रोजी भोकरी येथील जि.प.उर्दू शाळाच्या पटांगणावर जमिअते उलमा-ए-हिंद वरखेडी भोकरी यांनी हिंदू-मुस्लीम एकता राहावी यासाठी रोजा इफ्ताहर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

गरुड मित्र परिवारांतर्फे इफ्तार पार्टी
शेंदुर्णी । येथील आचार्य गजाननराव गरुड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शेंदुर्णी व संजयदादा गरुड मित्र परिवाराच्या वतीने पतसंस्था सभागृहात पवित्र रमजान महिन्यातील रोजेगार मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सपोनि हनुमंतराव गायकवाड तर प्रमुख उपस्थितीमध्ये संजयजी गरुड, पं.स. सदस्य डॉ.किरण सूर्यवंशी, माजी जि.प. सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, राजेंद्र पवार, दगडू गुजर, विठ्ठल फासे, पतसंस्था सचिव विनोद चौधरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, मुस्लीम समाजातील विविध पदाधिकारी, मुस्लीम रोजेगार उपस्थित होते, यावेळी संजय गरुड आणि रवी गायकवाड यांनी धार्मिक परंपरा जपत असतांना सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी येथील हिंदू व धर्माच्या नागरिकांनी चांगले योगदान दिले आहे. या पुढेही सामाजिक सलोख्याचे वातावरण कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी मुस्लीम नेते माजी उपसरपंच यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, सूत्रसंचालन माजी सरपंच सागरमल जैन यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पाचोरा येथील डीवायएसपी केशव पातोंड, सपोनि संदीप पाटील पिंपळगाव हरे, भाजपा युवानेते व नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक संजय वाघ, माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दीपकसिंग राजपूत, अरुण पाटील शेतकी सेना प्रमुख, अ‍ॅड. अविनाश भालेराव, पं.स.सदस्य ज्ञानेश्‍वर सोनार, साहेबराव पाटील, खलील देशमुख, मुक्तारशहा, जावेद खान, शेतकीसंघ संचालक डिंगबर पाटील यांची प्रमुख उपस्थितीत होती. तसेच मुस्लीम पंच कमेटीचे ट्रस्टी रज्जाक काकर, युनुस काकर, रशीद हजी उखर्डू, ईस्माईल हजी फकीरा, हैदर भिकन, डॉ अल्ताफ शेख, शफी सुलेमान, इलियास काकर, जमिअते उलमाचे ए हिंद वरखेडी भोकरी चे अध्यक्ष मोहम्मद अरमान, उपाध्यक्ष मोहम्मद अकिल, हफीज आकील, आफिज कलीम, हफीज सदाम के.के , हफीज अस्लम, हफीज इमरान, हफीज सुलतान, हफीज अकबर, हफीज मुस्तकीम, राकेश पाटील, डॉ. धनराज पाटील, ईस्माईल अ.सलाम, रुस्तम मुला, सलीम अब्दुल, हमीद अकबर, शफी रुस्तम, सुलतान कुरेशी, उस्मान आमिर शेख, भोकरी पो.पा प्रभाकर चौधरी, वरखेडी पो.पा. बाळू कुमावत, पत्रकार रविशंकर पांडे, दिलीप जैन, पो.कॉ विनोद पाटील, अरून राजपूत, हरी पवार, संजय बारी यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरखेड येथे ईफ्तार
चाळीसगाव । पवित्र रमजान महिना व रमजान ईद निमित्त शुक्रवार 23 जुन 2017 रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन व ग्रामस्थांच्या वतीने तालुक्यातील पिंपरखेड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तार पार्टीस आमदार उन्मेश पाटिल, ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे, दुरक्षेत्र कर्मचारी पोलिस नाईक नितिन अमोदकर, पोलिस नाईक आत्माराम भालेराव, गोपनीय कर्मचारी हवालदार शामकांत सोनवाने, पो.कॉ. गणेश पवार यांच्यासह पिंपरखेड येथील मशिदचे मौलाना मुस्लिम खान, बल्लार खान, पो.पा. नीलेश पवार, माजी सरपंच शेख अनीस, साजिद खान, ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ व मुस्लीम बांधव उपस्थित होते. तसेच 100 ते 150 ग्रामस्थ असे हजर होते. रमजान ईद उत्सव शांततेत पार पाडवा याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

चाळीसगाव येथे इफ्तार
चाळीसगाव । पवित्र रमजान व रमजान ईदनिमीत्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व मुस्लीम बांधवांच्या वतीने शहरातील जामा मशीद जवळ ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेश पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बछाव, डीवायएसपी अरविंद पाटील, तहसिलदार कैलास देवरे, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, सपोनि राजेंद्र रसेडे, राजेंद्र इंगळे, प्रदीपदादा देशमुख, विश्वास चव्हाण, भाजपाचे के.बी. साळुंखे यांच्यासह राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील, वसंत चंद्रात्रे, आण्णा कोळी, संजय पाटील, नगरसेवक बाळासाहेब मोरे, चंदु तायडे, सोमसिंग राजपुत, नानाभाऊ कुमावत, आनंद खरात, वसंत मरसाळे, मुस्लीम समाजाचे गफुर पहेलवान, अस्लम मिर्झा, गुलशेर खान, राजु भाई, अनिस मिर्झा आदी मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गोपनीय शाखेचे मधुकर पाटील, गणेश पाटील यांनी परीश्रम घेतले.