जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0

जळगाव – भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यात जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व खासगी विविध संघटनेतर्फे प्रतिमा पुजन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमळनेरातील गांधली पुरा पाटील प्राथमिक शाळा व सरस्वतील विद्या मंदीरात महापरीनिर्वाण दिन साजरा केला तर एरंडोल येथील गांधीपुरा भागातील फुले, शाहू व आंबेडकर नगरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन करून कार्यक्रमाचे आयोजन केले, चोपडा येथे सर्वपक्षिय मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तर यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील महिला महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

अमळनेर येथील शाळांमध्ये महामानवाला अभिवादन
अमळनेर । येथील गांधलीपुरा भागातील ग्रामविकास शिक्षण मंडळ मंगरुळ संचलित अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळेत येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळीे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन मुख्याध्यापक भरत पाटील यांनी केले. यावेळी उपशिक्षक अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली तर उपशिक्षक डी. सी. पाटील व प्रशांत कापडणे यांनी कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले तर आभार प्रविण तेले यांनी मानले. यावेळी उपशिक्षक प्रदीप सैंदाने, विनोद ठाकरे आदी उपस्थित होते. तर शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक रणजित शिंदे यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. उपशिक्षक ऋषिकेश महाळपुरकर यांनी सूत्रसंचलन केले. उपशिक्षिका संगीता पाटील, गितांजली पाटील, आनंदा पाटील, धर्मा धनगर आदी उपस्थित होते.

कासोदा येथे रिपब्लिकन पार्टीतर्फे माल्यार्पण
एरंडोल । कासोदा येथील आर.पी.आय (आठवले गट) यांच्या तर्फे महामानव भारतरत्न डॉ.बाासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवांदन कार्यक्रम करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार माजी ग्रामपंचायत सदस्य नुरुद्दीन मुल्लाजी यांनी डॉ.बाासाहेब आंबेडकरचे प्रतिमा पूजन केले. फौजदार नाजीम शेख यांनी दिपप्रज्वलन केले. सुत्रसंचालन आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर यांनी केले. प्रास्ताविक बुधा शिंदे यांनी केेले. यावेळी नुरुद्दीन मुल्लाजी, प्रविण बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केेले. आभार आर.पी.आय.सचिव मन्सुरखा पठाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी महेंद्र मोरे, जहिरअली सतारअली, राजरत्न पानपाटील, कैलास समशेर, भगवान मराठे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पिंटू मिस्तरी, उमजेखान, सुल्फीकार अली, आधार पाटील, शेख जहिर, शिवलाल बनसोडे, काशिनाथ पानपाटील, प्रमोद पानपाटील आदि उपस्थित होते.

डोंगरकठोरा महिला महाविद्यालय
डोंगर कठोरा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील कला, वाणिज्य कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन महिला महाविद्यालयातर्फे अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रचार्य डॉ. डी. जी. भोळे हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक कृतीशील नेतृत्त्व होते. जनतेसाठी सृजनशिलतेचा नंदादीप सतत तेवत ठेवण्याचा अथांग प्रयत्न त्यांनी केल्याचे मत प्राचार्य भोळे यांनी व्यक्त केले. बाबासाहेब हे जगातील सर्वात अभ्यासू ग्रंथप्रेमी होते. कुठेही गेले तरी एक पुस्तक ते विकत घेत असत, त्यातुनच त्यांनी वाचनाचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर तेवत ठेवला. असे विचार डॉ. विनोद मोरे यांनी मांडले. यावेळी शिल्पा भारंबे, ज्योत्स्ना माळी, मिताली बारी, पल्लवी पाटील, पटेल शयनाज या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन एम.ए.ची विद्यार्थिनी गौतमा साळुंखे तर आभार कल्पना तायडे यांनी मानले.
आंबेडकर नगरात बौद्धविहारामध्ये समाजबांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी सरपंच सुमन वाघ, ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप सोनवणे, जितेंद्र पारधे, विकास तायडे, विशाल सपकाळे, भूषण सपकाळे, प्रदीप तायडे, योगेश आढाळे, रवि भालेराव, नाना आढाळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

चोपड्यात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
चोपडा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध क्षेत्रातिल मान्यवरांनी अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सकाळपासुन विविध क्षेत्रातील मान्यवारांनी माल्यार्पण करून बुध्दवंदना म्हणून अभिवादन केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव सोनवणे, नगरसेवक अशोक बाविस्कर, अ‍ॅड. चद्रकांत सोनवणे, आर टी वाल्हे, उमेश नगराळे, विनोद बाविस्कर, प्रविण बाविस्कर, सुधाकर बाविस्कर, करंदीकर, भालेराव, साळूखे, तायडे यांचासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

महिला माध्यमिक विद्यालय
चोपडा । येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात संस्थेच्या सचिव उर्मिलाबेन गुजराथी, संचालिका अश्विनी गुजराथी, अ‍ॅड. सारंगी गुजराथी, अवनी गुजराथी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, डॉ. विष्णु गुंजाळ, प्रा आशिष गुजराथी, मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका अपुर्वा कुलकर्णी यांनी प्रारंभी प्रतिमापूजन करुन माल्यार्पण केले. यावेळी बोलतांना अ‍ॅड. सारंगी गुजराथी म्हणाल्या, मंदिरात रांगा लावण्यापेक्षा ग्रंथालयात आपला वेळ घालवल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार होण्यास मदत होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितोद्धारासाठी केलेल्या कार्याची व त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती नव्या पिढीला देण्यात आली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असतांनाही त्यांनी पुस्तकांवरील आपले प्रेम कमी होऊ दिले नाही. डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच अनेकांना ज्ञानाचा प्रकाश मिळाला. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.डी. चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होता.

बाबासाहेब हे ग्रंथरूपी पुस्तकांचे कर्ज – प्रा. गाडगे
एरंडोल । या जगात प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धत्तीचे कोणत्या तरी कारणामुळे आर्थिक कर्ज माणसावर असते. परंतु महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जीवनाच्या शेवटपर्यंत ग्रंथरूपी पुस्तकांमुळे कर्ज होते. अशा महामानवाने आपले जिवन दिनादलित, शोषित समाजाच्या उद्धारासाठी अर्पण केले. जीवनाच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत समाज सुधारण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन दा.डी.शंकर पाटील महाविद्यालयातील ग्रंथपाल प्राध्यापिका एस.व्ही.गाडगे यांनी गांधीपुरा भागातील फुले शाहु आंबेडकर नगरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला समाजातील निवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार ,भिमराव खैरनार, जेष्ठ समाजसेवक प्रा.शिवाजीराव अहिरराव, प्रा.रणजीत मोरे यांनी मार्गदर्शन केले. उमेश सुर्यवंशी या विद्यार्थ्याने डॉ.बाबासाहेबांना कविता म्हणुन आदरांजली वाहिली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद महाजन,अरुण नेटके,आनंद सैन्दांशिव,डॉ.अतुल सोनवणे,संघरत्न गायकवाड, प्रकाश शिंदे, सुरेश खैरनार, सुनील खैरनार, चंद्रशेखर खैरनार, संजय खैरनार आदी हजर होते. तसेच शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला शहरातील सामाजिक,राजकीय कार्यकर्त्यांनी माल्यार्पण वाहून अभिवादन केले.