धुळे। जि ल्ह्यात 31 मे ते 7 जून 2017 या कालावधीत तंबाखू नकार सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन नागरिकांमध्ये तंबाखूपासून होणार्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मिशन इंद्रधनुष्य मोहीम जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, डब्ल्यू. एच. ओ. चे वैद्यकीय दक्षता अधिकारी डॉ. एम. ए. एच. अझहर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन चित्तम, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, उपमुख्य कार्यकारी अनिल सोनवणे (पाणी व स्वच्छता) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद मोरे, माता- बालसंगोपन अधिकारी डॉ. आर. पी. पाटील, ङ चंद्रकांत येशीराव उपस्थित होते.
बालकांच्या लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी
लसीकरणबात पालकांमध्ये जनजागृती करावी. प्रत्येक बालकाच्या लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न केले पाहिजेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी नमूद केले. तत्पूर्वी नवसंजीवनी योजनेंतर्गत गाभा समितीची सभा झाली.
वंचीत बालकांचे लसीकरण करावे
धुळे जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य अभियानाचा तिसरा टप्पा 7 जून रोजी राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून लसीकरणापासून वंचीत प्रत्येक बालकाचे लसीकरण करावे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मिशन इंद्रधनुष्य मोहीम जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत मे 2017 राबविण्यात आलेल्या मोहिमेत 1119 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणापासून पूर्णत: वंचीत किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालकांचा शोध घेवून त्यांचे लसीकरण करावे.
तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत माहिती
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, तंबाखूचे दुष्परिणाम घातक आहेत. देशात रोज 2500 नागरिक तंबाखूशी संबंधित आजारामुळे मृत्यूमुखी पडतात. सप्ताहात तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत शासकीय विभागांसमवेत कार्यशाळेचे आयोजन करणे, कॅन्सर वॉरियर या संघटनेच्या मदतीने परिणामांबाबत व पोलिस विभागासमवेत बैठक घेणे, मौखिक कर्करोग निदानासाठी शिबिराचे आयोजन करणे, कर्करोगाच्या रुग्णांसाठी व्याख्यानाचे आयोजन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.