जळगाव – जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात तब्बल नवीन २६१ रूग्ण कोरोना बाधित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आज दिवसभरातील ७४ रूग्णांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. साडेतीन महिन्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत आहे. तरी देखिल त्याचे गांभीर्य नागरिकांना नसल्याचे शहरात होणार्या गर्दीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात दि. १५ रोजी १२४, दि. १६ रोजी ६३ आणि आज ७४ नविन रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव ३५, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ९, अमळनेर २, चोपडा ५, पाचोरा १, भडगाव १, धरणगाव १, जामनेर १, पारोळा ३ आणि इतर जिल्ह्यातील एक असे एकुण ७४ रूग्ण आढळुन आले असुन दिवसभरात भुसावळ येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५७८५२ इतकी झाली आहे.