जिल्ह्यात दारू अड्ड्यांवर कारवाई

0

साक्री। सर्वोच्य न्यायालच्या राज्य महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत असतांना दुसरीकडे गावठी दारूला मोठा भाव चढला आहे. खेडो पाड्यासह जिल्ह्यात गावठी दारूचा महापूर आला आहे. बियरबार बंद झाल्यामुळे तळीरामांनी गावठी दारू अड्ड्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान या गावठी दारूच्या अड्ड्यावर महिन्याभरापासून पोलीसांची एका मागुन एक कारवाई सुरू असतांना शनिवारी साक्रीसह धुळ्यात गावठी दारूवर कारवाई करत लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे. धुळे तालुका पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत चित्तोड शिवारात छापा टाकून गावठी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला़ घटनास्थळी गावठी दारूसह कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 34 हजार रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसाने यांच्यासह पथकाच्या कारवाईत शनिवारी सकाळी चित्तोड शिवारात नाल्याकाठी 200 लिटर क्षमतेचे 21 ड्रम आढळून आल़े त्यात आठ ड्रममध्ये कच्चे रसायन व 60 लिटर तयार दारू असा एकुण 1 लाख 34 हजार 60 रूपये किंमतीचा मुद्येमाल आढळून आला़ पथकात उपनिरीक्षक स्वप्नील कोळी, एऩ ए़ रसाळ, सैंदाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओंकार गायकवाड, ह़ेकाँ राजेंद्र मोरे, पोऩा सतिष कोठावदे, पोक़ाॐ सचिन माळी यांचा समावेश होता़

गणेशपूर रोडवरील मुद्देमाल हस्तगत
साक्री : तालक्यातील गणेशपुर रोडवर नदीपात्रात गावठीदारु साठवुन ठेवल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत जवळपास पाऊण लाखाहून अधिक रक्कमेचा दारुसाठा पोलिसांच्या हाती लागला असून आरोपी मात्र फरार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशीकी, गणेशपुर रोडवर नदीपात्रात मिळाली असता त्यांनी वसंत पवार, धनराज पाटील, प्रकाश सोनवणे, वाघ, खैरनार, वसावे, पावरा, जाधव, मोरे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

शेडमध्ये गावठी दारू आढळली
या पथकाने गणेशपुर रोडवर जावून पाहिले असता नदी पात्रात पालापाचोळा असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारु गाळली जात असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांना पाहून दारु गाळणारा पळून गेला तर सुमारे 78 हजार रुपये किंमतीचामाल पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तो जप्त केला असून तशी नोंद पोलीस ठाण्यात केली. एका शेडमध्ये गावठी दारु गाळली जात असल्याची खबर पोलीस निरीक्षक आर.एस.पाटील यांना मिळाली होती.