जळगाव। शहरासह जिल्ह्यात सर्पदंश होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी देखील जिल्ह्यात पाच जणांना संर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या असून जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. गुरूवारी जिल्ह्यात पाच जणांना सर्पदंश झाले असून बुधवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांना सापाने दंश केले.
या पाचही जखमींची प्रकृति खालावल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सर्पदंश झालेल्यांमध्ये रामचंद्र त्र्यंबक चव्हाण (वय-40 रा. पथराड), नंदाबाई धनराज नरवाडे (वय-35 रा.विटनेर), गोकर्णाबाई राहूल बोदडे (वय-25 रा. सेलवड),वैशाली संदिप इंगळे (वय-30 रा.चिंचखेडा), छाया भिकारी अडकमोल (वय-35 रा.मोहराडा) अशांचा समावेश आहे.