जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यासोबतच दैनंदीन कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्युचाही आकडा वाढतच आहे. दिवसभरात २२ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज नव्याने १०५९ रूग्ण बाधित झाले असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची परिस्थीती अत्यंत गंभीर होत आहे. आज दिवसभरात नव्याने १०५९ रूग्ण आढळुन आले आहेत. आत्तापर्यंत एकुण रूग्णांची संख्या १ लाख ९२७७ इतकी झाली असुन ९६ हजार १५३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज आढळुन आलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर १९०, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ १६१, अमळनेर २२, चोपडा १३२, पाचोरा ६६, भडगाव ५२, धरणगाव ४२, यावल ६५, एरंडोल ६७, जामनेर ६८,
रावेर ३९, पारोळा ३७, चाळीसगाव ३६, मुक्ताईनगर ८, बोदवड ४९ आणि इतर जिल्ह्यातील १३ रूग्ण असे एकुण १०५९ रूग्ण आढळुन आले आहेत. तर १०७४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
बाधित २२ रूग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आज २२ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ७, एरंडोल तालुक्यात ४, पारोळा तालुक्यात ३, जामनेर आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी २, अमळनेर, जळगाव, मुक्ताईनगर आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकुण २२ रूग्णांचा आज मृत्यू झाला
आहे.
Next Post