जिल्ह्यात पुन्हा 132 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

0

जळगाव । जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी पुन्हा नव्याने 132 नवीन रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून आतापर्यंत 2281 कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्यांमध्ये जळगाव शहर 18, जळगाव ग्रामीण 6, भुसावळ 10, अमळनेर 2, चोपडा 27, पाचोरा 5, भडगाव 18, धरणगाव 3, यावल 5, एरंडोल 4, जामनेर 2, रावेर 8, पारोळा 13, चाळीसगाव 7, मुक्ताईनगर 2 तर अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.