जिल्ह्यात पोलीस ठाण्यांना मिळाले नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक

0

औरंगाबाद, गडचिरोली, नाशिक, पुणे, जालना आदीं जिल्ह्यातून अधिकारी येणार बदलून ; जिल्ह्यातीलच काहींची प्रभारी म्हणून वर्णी

जळगाव : जिल्ह्यातील पोलीस उपनिरिक्षक ते निरीक्षक दर्जाच्या 19 पोलीस अधिकार्‍यांच्या गृह विभागाच्या अधिसुचनेनुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात काही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील रिक्तपदांवर जालना, गडचिरोली, नाशिक ग्रामीण, पुणे ग्रामीण, सातारा, औरंगाबाद, पालघर येथून सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक बदलून येत आहेत. तर काही जिल्ह्यातीलच सहाय्यक पोलीस निरीक्षकांची जिल्ह्यातीलच विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रभारी म्हणून वर्णी लागली आहे.

दि. 16 रोजी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक होवून सदर बैठकीमध्ये जिल्ह्यात नव्याने पोलीस उपनिरिक्षक पदावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाच्या पदोन्नतीवर हजर, कार्यरत असलेल्या पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्याशी कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. याचवेळी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वानुमते बदल्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार डॉ. पंजाबराव उगले यांनी मंगळवारी बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. तसेच संबंधित अधिकार्‍यांनी बदली, पदस्थापना ठिकाणी कर्तव्यावर हजर होत असल्याबाबत अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेशही पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

जिल्हयात बदलून आलेले अधिकारी
शहरासह जिल्ह्यात रिक्त असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये बाहेरील जिल्ह्यांमधून अधिकारी बदलून येत आहेत, यात सपोनि संदिप अशोक हजारे हे गडचिरोली येथून एमआयडीसी पोलीस स्टेशनला रिक्त जागी, सपोनि रवींद्र पांडूरंग बागूल जालना येथून पारोळा पोलीस स्टेशन, सपोनि शितलकुमार जयवंतराव नाईक नाशिक ग्रामीण येथून रावेर पोलीस स्टेशन, सपोनि जयेश धुडकू खालणे पुणे शहर येथून एमआयडीसी पोलीस स्टेशन, सपोनि सिध्देश्वर हेमंत आखेगावकर पुणे ग्रामीण येथून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव सपोनि हर्षा जिभाऊ जाधव जळगाव येवून चाळीसगाव ग्रामीण, सपोनि रुपाली संभाजी चव्हाण सतारा येथून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, सपोनि गणेशपुरी बाबुपुरी बुवा नाशिक ग्रामीण येथून जळगाव शहर पोलीस स्टेशन, सपोनि अनिल छब्बु मोरे पुणे ग्रामीण येथून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, सपोनि राकेशसिंह सुरेशसिंह परदेशी पालखर येथून पहूर पोलीस स्टेशन, सपोनि तुषार मुरलीधर देवरे औरंगाबाद शहर येथून एरंडोल पोलीस स्टेशन, सपोनि दीपक रामदास औरंगाबाद शहर येथून शनिपेठ पोलीस स्टेशन तर सपोनि धरमसिंग विठ्ठल सुंदरडे यांची औरंगाबाद येथून जामनेर पोलीस स्टेशनला बदली झाली आहे.

जिल्ह्याअंतर्गत खांदेपालट
पोलीस अधीक्षकांनी शहरासह जिल्ह्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षकांची जिल्ह्यातीलच विविध पोलीस ठाण्यांमध्ये खांदेपालट केली आहे, यात सपोनि स्वप्निक किशोर नाईक जळगाव येथून स्थानिक गुन्हे शाखा, पो.नि. भिमराव बाबुराव नांदुरकर यांची चोपडा येथून जळगाव शहर पोलीस स्टेशनला दुय्यम पोनि पदी, सपोनि दिलीप कचरु शिरसाठ पहूर पोलीस स्टेशन येथून जिल्हापेठ पोलीस स्टेशन, सपोनि संदिप सहदेव आराक जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येवून चोपडा ग्रामीण येथे प्रभारी म्हणून, सपोनि हनुमान लाहनू गायकवाड धरणगाव येथून पाळधी दूरक्षेत्र तर पोउपनि राजेंद्र भिमसिंग मांडेकर यांची चोपडा ग्रामीण येथून टीएमसी सेल येथे बदली झाली आहे.