जळगाव – जिल्हाभरात २६ जानेवारी ‘प्रजासत्ताक दिन’ विविध सांकृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये सकाळी कार्यक्रमांचे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते दध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिन शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व खासगी संघटनांद्वारे तिरंगाला मानवंदना दिली. यावेळी शाळेत सकाळी गावागावातून ‘भारत माता कि जय’, ‘एक रुपया चांदी का- सारा देश गांधी का’, ‘प्रजासत्ताक दिन चिरायू होवो’, अश्या अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तर एन.सी.सी. आणि एम.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे यांच्या समोर परेड करून विविध खेळांचे प्रात्याक्षिके सादर केले.
एकोप्यासाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होऊ या – ना. अर्जून खोतकर
जळगाव – राज्याच्या विकासाच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवून सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौदार्हपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साऱ्यांनी करु या, असे आवाहन दुग्धव्यवसाय विकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. अर्जून खोतकर यांनी आज येथे केले. येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर ना. खोतकर यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शानदार संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम
या कार्यक्रमात ना. अर्जून खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांनी उघड्या जीप मधून परेडची पाहणी केली. परेडचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक धनजंय पाटील यांनी केले. यावेळी झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय, महिला व पुरुष पथके, वाहतुक शाखा, होमगार्ड महिला व पुरुष पथके, ओरीयन इंग्लिश स्कुल, ए.टी. झांबरे विद्यालय, आर.आर. माध्यमिक विद्यालय, मुलजी जेठा विद्यालय,सेंट जोसेफ इंग्लिश मिडीयम स्कुल, ला. ना. माध्यमिक विद्यालय, सिध्दी विनायक इंग्लिश स्कुल, काशीबाई उखाजी कोल्हे इंग्लिश स्कुल, सेंट टेरेसा इंग्लिश स्कुल, बेंडाळे महिला महाविद्यालय, ॲग्लो उर्दू विद्यालय, श्रीराम माध्यमिक विद्यालय या विद्यालयांच्या एन.सी.सी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पथक, आर.एस.पी पथके, स्काऊट-गाईड पथक, राष्ट्रीय सेवा योजना आदी पथकांनी सहभाग घेतला व शानदार संचलन केले. तसेच पोलीस दलाचे बॅण्ड पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, वरुण रथ, निर्भया पथक, महापालिकेचे अग्निशामक व बचाव पथक, ॲम्बुलन्स 108, तसेच मुद्रा बँक योजना प्रचार व प्रसार समन्वय समितीतर्फे तयार करण्यात आलेला प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला व बालविकास विभागाचा बेटी बचाओ बेटी पढाओ, कृषि विभागाचा जलयुक्त शिवार, महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा सर्व शिक्षा अभियान, सामाजिक वनीकरण विभागाचा झाडे लावा, झाडे जगवा आदि चित्ररथांनी सहभाग घेतला.
उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा केला सत्कार
परेड निरिक्षणानंतर ना.खोतकर यांच्या हस्ते सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी किशोर पाटील यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर पोलीस दलात शौर्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल योगेश तांदळे, युवराज रबडे, अजितसिंग देवरे, युवराज पाटील, नंदकिशोर सावखेडकर यांचा तर सामाजिक वनीकरण विभागातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेता रुपेश बिऱ्हाडे, राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल विनोद अहिरे व ग्रुप आणि डॉ. प्रा. अनिता पाटील, डॉ. निलेश चांडक, मुकुंद गोसावी यांचाही मंत्रीमहोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास आमदार चंदुलाल पटेल, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार मंदार कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन श्रीमती उषा शर्मा, जी. एम. उस्मानी, राजेश यावलकर यांनी केले.
देवकर अभियांत्रिकीत प्रजासत्ताक दिन उत्साहात
जळगाव – येथिल गुलाबराव देवकर अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अंध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विकास निकम, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील, उपप्राचार्य प्रा.सी.एस. पाटील, विभाग प्रमुख प्रा.आर.वाय. पाटील, प्रा. हरिओम अग्निहोत्री, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा.आर.ए. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.एम.पी.पाटील, कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य प्रा.एस.आर . पाटील सह इतर प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.एस.एन. देशमुख यांनी तर पथसंचलन क्रिडा समन्वंयक प्रा. किरण नेहते यांनी केले. फार्मसी महाविदयालयात संस्थेच्या आंबेडकर मार्केटमधील फॉर्मसी अॅण्ड रिसर्च महाविदयालयात देखिल ध्वजारोहण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रा. नितिन पाटील सह ईतर प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. तर स्वामी समर्थ विदयालयात संस्थेच्या गुजराल पेंट्रोल पंप परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विदयालयात ध्वजारोहन संस्थेचे संचालक डॉ. विकास निकम यांच्या हंस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा महाजन सह इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
तळेगाव माध्यमिक विद्यालय
चाळीसगाव – तालुक्यातील तळेगाव येथील माध्यमिक विद्यालय, जि.प. शाळेत जि.प.सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. “आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस असे अतुल देशमुख यांनी यावेळी संबोधित केले. ग्रा.पं. कार्यालयात सरपंच सोनाली देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लोकशाहीच्या उदघोषाचा आजचा दिवस अतिशय महत्वपुर्ण असाच आहे,प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे, असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते असे मत सोनाली देशमुख यांनी ध्वजारोहण प्रसंगी स्पष्ट केले. तळेगाव गावात अनेक ठिकाणी तोरणे-पताका, लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करतांना दिसून येत होती. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे सुंदर संचलन, कवायती, लेझीम, शाळेतील वाद्य-वृंदावर राष्ट्रीय गाणी, राष्ट्रीय एकात्मतेची शपथ, मुख्याध्यापंकाकडून गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. बालचमुंना खाऊवाटप अशा कार्यक्रमांद्वारे शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.डी.वाबळे, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा लिंडायत, सुर्यभान घोडेस्वार, सुदेश दराडे, उज्ज्वला जाधव, किसन वाघ, केंद्रप्रमुख विनायक ठाकूर, शिक्षक संभाजी पाटील, देविदास मोरे, जगदीश पाटील, किशोर शितोळे, कल्याण देशमुख, राजेंद्र शितोळे, अनिल कासार, प्रकाश देशमुख, मनोज देशमुख तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी बांधव, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फास्टफूडपासून पालकांनी मुलांना दूर ठेवावे- डॉ. कोतकर
चाळीसगाव – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलीत एच.एच.पटेल (सरस्वती) विद्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीमय वातावरणात विविध गाणी, कविता निर्भिडपणे सादर केल्यात. डॉ.विनोद कोतकर यांनी निरोगी व सुदृढ शरीर हाच, खरा अलंकार असल्याचे सांगत फास्टफूडपासून पालकांनी मुलांना दूर ठेवावे. यातूनच खर्या अर्थाने सशक्त व समृद्ध भारताचे निर्माण होईल असे सांगितले. प्रसंगी मुख्याध्यापक श्री हिवाळे सर ,सर्व शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते.
चाळीसगाव महाविद्यालयात एन.सी.सीच्या कॅडेटसची मानवंदना
चाळीसगाव – चाळीसगाव महाविद्यालयात प्राचार्य मिलींद बिल्दीकर यांच्याहस्ते ध्वजारोहणकरण्यात आले. याप्रसंगी एन.सी.सीच्या कॅडेटसनी मानवंदना दिली. याप्रसंगी के.आर.कोतकर ज्युनीयर कॉलेजचे चेअरमन श्यामलाल कुमावत, माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, उपप्राचार्य डॉ.प्रकाश बावीस्कर, उपप्राचार्य सलीलकुमारी मुठाणे, उपप्राचार्य अजय काटे, उपप्राचार्य सुभाष भिंगारे,कार्यालयीन प्रमुख हीलाल पवार, एन.सी.सी प्रमुख प्रा.राजेश चंदनशीव, प्रा. मनीषा सुर्यवंशी, प्रा.आर.एस.पाटील, एन.सी.सी.चे कॅडेट एन.एस.एस.चे व्हालेंटीयर्स प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. छोटू राजाराम पाटील यांनी महाविद्यालयास एयरगन भेट दिली. रोहीत ओशाळकर यांनी महाविद्यालयास ढाल भेट दिली. मेजर प्रा.बि.एस वाघमारे यांच्यातर्फे दिला जाणारा पूरस्कार कॅडेट आनील परदेशी याला देण्यात आला. तर प्राचार्य मिलींद बिल्दीकर यांच्यातर्फे दिलाजाणारा कै. शैलजा बिल्दीकर बेस्ट फिमेल कॅडेट पूरस्कार आश्वीनी कुंभारे हीला देण्यात आला. याप्रसंगी सेवा निवृत्त होणाऱ्या प्रा. श्रीमती देशपांडे, प्रा.डी.आर. राणे उपप्राचार्य सुभाष भिंगारे, श्रावण सुर्यवंशी यांचा सत्कार केला. प्राचार्य मिलींद बिल्दीकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की भारताला बाहेरील शत्रूं बरोबरच अतंर्गत दहशत वादाचा देखील धोका आहे.विद्यार्थ्यांनी माता भगीनींची सुरक्षा केली पाहीजे, विद्यार्थीनींनी स्वक्षिम झाले पाहीजे. त्यांनी स्वच्छते बाबतीत देखील मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन प्रा. धनंजय वसईकर यांनी केले.