जळगाव । मुस्लिम खाटीक वेल्फेअर असोसिएशनने मुफ्ती हारुन नदवी यांच्या नेतृत्वाखाली शंभर सदस्यांचा शिक्षण काफीला जिल्ह्यात जनजागृतीसाठी आज पाठविला.
महापौर नितीन लढ्ढा, गनी मेमन, प्रशांत बातीक, करी अकील, इकबाल पिरजादे, सपोनि समाधान पाटील, जमियत उलेमाचे हाफिज रहीम आदींनी या काफील्याला हिरवी झेंडी दाखविली. जळगाव, धुळे, रावेर, फैजपूर, पिंप्री, पिंपळगाव, पाचोरा, भडगाव येथील खाटीक समुदायाचे कार्यकर्ते या काफील्यात सहभागी आहेत. समाजात मुलांनी शिक्षण घ्यावे आणि विवाह व निकाह सुलभ पध्दतीने केले जावेत म्हणून हे लोक जनजागृती करणार आहेत.