जिल्ह्यात फुटबॉल स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जळगाव । येथील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये फुटबॉलमय महाराष्ट्र या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव रायसोनी समुहातील पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, मेनेजमेंट व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 8 संघ सहभागी झाले होते. यावेळी आयोजित स्पर्धा दोन गटात उत्साहात पार पडल्या. पुढील फुटबॉल चेम्पियन स्पर्धेत आपले दमदार नेतृत्व करणारे खेळाडू शोधता यावेत या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने फुटबॉलमय महाराष्ट्र हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागातील सर्वच ठिकाणी खेळाडूंचे दर्शन होईल असा एकेरी सूर मान्यवरांनी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काढला. यावेळी प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, प्रा.रफिक शेख, प्रा.गौरव जैन, प्रा.भूषण राठी, प्रा. विजय गर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा संचालक प्रा.संजय जाधव यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

अंजनविहिरे विद्यालयात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
भातखंडे । येथून जवळच असलेल्या अंजनविहिरे येथील माध्यमिक विद्यालयात 17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेनिमित्ताने होणार्‍या महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन अंतर्गत शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व शाळांत फुटबॉल खेळला गेला. लोकप्रतिनिधी, पोलिस, शासकीय- निमशासकीय कर्मचार्‍यांसह शाळा आणि महाविद्यालयांतील खेळाडू सहभागी होतील. जिल्ह्यात सुमारे 30 हजार खेळाडू एकाच दिवशी एकाच वेळी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटून भारतीय संघास शुभेच्छा दिल्यात यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व्ही.झेड.पाटील, क्रिडा शिक्षक हेमंत सोनवणे व शिक्षक, शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.

भडगाव शहरात स्पर्धांचे उद्घाटन
भडगाव । येथील लाडकुबाई विद्यामंदिर व पाटील कनिष्ठ महाविद्यालयात फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2017 अंतर्गत फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. एकुण सहा संघांनी फुटबॉल क्रीडाक्रांतीमध्ये सहभागी होऊन शासनाच्या उपक्रमात सहभाग नोंदवला. पहिला सामना 9 वी (ब) विरुद्ध 10 (क) या संघा दरम्यान खेळला त्यात 10 वी (क)च संघ 2-0 नी विजयी झाला. दूसरा सामना 8 वी (क) मूली विरुद्ध 10 वी (क) मूली या संघा दरम्यान खेळला गेला हा सामना 0-0 ने बरोबरीत सुटला. तीसरा सामना एल.के.सी विरुद्ध जी.के.सी या उभय दोन्ही संघात शिक्षकांचा सहभाग होता या सामन्यात एल.के.सी. ने 2-0 ने हा सामना जिंकला. प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्ष शामकांत भोसले, ए.पी.आय रविंद्र जाधव, नगरसेविका योजना पाटील, केंद्र प्रमुख गणेश पाटील, आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय मिशन 1 मिलियनची माहिती दिली यशस्वितेसाठी उपमुख्याध्यपक आर.एस.पाटील, क्रीडा शिक्षक सतीष पाटील, डी.एस.पाटील, पी.जी.सोनवणे सह सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डी.डी.भोसले यांनी केले.

पोदार इंटनॅशनल स्कुल चाळीसगाव
चाळीसगाव । 17 वर्षाखाली आतील फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे यजमान भारत असल्याकारणाने महाराष्ट्र शासनाने मिशन 1 मिलीयन अंतर्गत फुटबॉल स्पर्धेचे महाराष्ट्रभर आयोजन केले. शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे आमदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते फुटबॉलला किक मारून स्पर्धेची सुरूवात करण्यात आली. खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभगा घेतला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल फिवर ओसंडून वाहत होता.

पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा
लोहारा । येथील डॉ. जे.जे.पंडील माध्यमिक विद्यालयात फुटबॉल स्पर्धांचे आयोजन उत्साहात पुर्ण वातावरणात करण्यात आले होते. सामन्यांचे उद्घाटन येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवेंद्र शेळके यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संपर्क अधिकारी ए.ए.पटेल उपस्थित होते. सदर प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी व्ही.एम.शिरापुरे, डी.एम.गरूड, श्री. गुजर, एस.के.पाटील, श्री. बैरागी आदींनी परीश्रम घेतले.