जिल्ह्यात बारावीमध्ये शहाद्याचा कार्तिकेय अहिरे प्रथम

0

शहादा। शहरातील व्हालंटरी कला वाणिज्य व सायन्स उच्चमाध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कार्तिकेय रवींद्र अहिरे हा 90.15 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिला आला. त्याने प्रशासकीय सेवेत जाण्याच्या मानस व्यक्त केला. त्याला आय.ए.एस. अधिकारी व्हायचे आहे. कार्तिकेयने अभ्यास करताना रोज नियमित 8 ते 9 अभ्यास करत असल्याचे सांगितले. आणि त्यामुळे परिक्षेचावेळी खुप जागरण वैगरे करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

कार्तिकेयचे सर्व स्तरातून कौतुक
अभ्यास हा बोर्डाने ठरवून दिलेल्या टेक्स बूक व काही प्रमाणात रेफरन्स पुस्तके अमलात आणली. जास्तीत जास्त रोज 11 ते 12 वाजेपर्यंत अभ्यास करणे. व तो देखील नियोजन पुर्वक असायचा. ही प्रेरणा माझी बहीण स्वर्गीय प्राजक्ता हिच्याकडून मिळाली ति मला नेहमी प्रथम येण्यासाठी प्रेरणादायी ठरली. व आजच्या यशाचे श्रेय मी तीला समर्पित करत असल्याचे त्याचे म्हणणे होते. आजच्या या माझ्या यशात माझे आईचे व वडिलांचे तसेच कुटुंब सदस्य विनोद काका माझे सर्व गुरुजण ह्यांचे मोठ्या योगदान आहे. आई श्रीमती क्रांती जाधव व वडील रवींद्र अहिरे हे दोघेही प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. त्याच्या या यशाबद्द्ल संथेचे सचिव डॉ. राजेश कुलकर्णी व प्राचार्य न म्रता पाटील यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले. या यशाबद्द्ल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.