जळगाव। पंंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षा निम्मिताने कार्यविस्तार योजनेचे तसेच आभ्यास वर्गाचे आयोजन भाजप ग्रामीण च्या वतीने करण्यात आले होते. पंडीत दिनदयाळ यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने केलेले कार्य तसेच संघटनेचे विचार देशात विस्तारित करण्यासाठी घेतलेले परिश्रम आदी विषयावर कार्यविस्तार आणि आभ्यासवर्गात मान्यवरांनी मार्गदर्शन करण्यात केले.शहरातील बालानी रिसोर्ट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून कार्य विस्तारक अभय आगरकर याची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील,संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हापरिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,कार्य विस्तारक शशिकांत वाणी,ग्रामीण जिल्हाअध्यक्ष उदय वाघ,जी.प सदस्य प्रभाकर सोनवणे,पोपट भोळे यांच्या सह ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
आभ्यास वर्गात मुख्य मार्गदर्शक म्हणून कार्य विस्तारक अभय आगरकर यांनी ग्रामीण भागात काम करणार्या विस्तारकाना राज्यात संघटनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच पक्षाचे एकत्रीकरण ,कार्यकर्त्यांच्या नोंदी,तसेच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा संघटन सरचिटणीस भाजपा प्रा डॉ सुनील नेवे यांनी पंडीत दीनदयाळ यांच्या जीवन शैली,विस्तारक संकल्पना,जन्मशताब्दी कार्यक्रम आणि त्यांनी केलेले कार्य कार्यकर्त्यांनी देखील आत्मसात करण्याचे आवाहन केले. नाशिक येथील डॉ तुषार चांदवडकर यांनी जीवनदर्शक या विषयावर कार्यकर्त्यांना संबोधले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे आपल्या मार्गदर्शना मध्ये सांगितले.
महाराष्ट्रात 90 हजार बूथ पर्यत कार्यकर्ते पोचणार
संघटन मंत्री किशोर काळकर यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधताना,100 वर्ष पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी पक्ष वाढीसाठी केलेले कार्य महान असून त्यांचे विचार समाजात लोकापर्यत पोहचणे गरजेचे आहे. राज्यात यासाठी पंडित दीनदयाळ समिती नेमण्यात आली. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष वाढण्यासाठी विस्तार्काची भूमिका पार पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता पर्यत झालेल्या निवडणुकी मध्ये कार्यकर्त्याच्या मेहनतीने चांगले यश आले. आता निवडणुका नसल्याने त्या सहा महिन्याचा उपयोग पक्ष वाढीचा कार्यासाठी करावा.वर्षातील काही दिवस पक्ष वाढण्यासाठी देणे गरजेचे आहे. सचिन पाटील ह्या कार्यकर्त्याने पक्षासाठी सहा महिने देण्याचे ठरविले आहे. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले. संघटन मंत्री काळकर पुढे बोलताना म्हणाले कि,प्रतेक मतदार संघात विस्तारक हि संकल्पना 25 मे ते 10 जून या कालावधी मध्ये राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे केंद्रात सरकार स्थापन करून तीन वर्षे होत असताना 26 जूनला विस्तारकार्याला जिल्ह्याभरात प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली.
कार्यकर्ते जाणार ग्रामीण भागात
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आता पर्यत झालेल्या निवडणुकामध्ये मोठे यश प्राप्त झाले. आता भाजपने ग्रामीण भागात पक्ष वाढीच्या दृष्टीने लक्ष वेधण्यासाठी केद्रात आणि राज्यात भाजप सरकारने केद्रात व राज्यात केलेली विकास कार्याचे महत्व ग्रामीण भागात माहिती व्हावे यासाठी ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्याचा आभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यात ग्रामीण भागातील पंचायत समिती आदी भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे.