अमळनेर । येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त राजपूत एकता मंचच्या वतीने भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले. महाराणा प्रताप चौकाजवळील विश्रामगृहात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते होऊन शोभयात्रेस सुरुवात झाली. तत्पूर्वी कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या सहयोगातून महाराणा प्रताप चौकातील महाराणांच्या डिजिटल फ्रेमचे लोकार्पण नागराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. पाचोर्यांचे आमदार किशोर पाटील यांनीही शोभयात्रेत सहभाग घेवून ठेका धरला होता.
चाळीसगाव येथे महाराणा प्रताप यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन
चाळीसगाव । महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने महाराणा प्रताप जयंती चाळीसगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी रेल्वे स्टेशन जवळ महाराणा प्रताप यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पुजन पाचोरा येथील माजी आमदार आर. ओ. पाटील, आमदार उन्मेश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, प्रा. साहेबराव घोडे, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आण्णासाहेब पवार, वसंत चंद्रात्रे, ठाणसिंग राजपुत, नानाभाऊ पवार, प्रमोद पाटील, शेषराव पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपुत, संजय पाटील, शामलाल कुमावत, रामचंद्र जाधव, सुरेश स्वार, अरुण अहीरे, शाम देशमुख, नगरसेविका सविता राजपुत, राजेंद्र गवळी, माजी नगरसेवक भगवान राजपुत आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
चाळीसगाव आगार कर्मचार्यांतर्फे अभिवादन
नुकतेच नुतनीकरण झालेल्या चाळीसगाव बसस्थानक येथे चितोडनरेश महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आगार कर्मचार्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे अनावरण आमदार उन्मेष पाटील, पाचोर्याचे माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक भगवान पाटील, संजय पाटील, शाम देशमुख, आजी – माजी लोकप्रतिनिधी, राजपूत समाज संघटनांचे पदाधिकारी व एसटी कर्मचारी आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन
महाराणांच्या प्रतिमेचे पूजन आ. स्मिता वाघ ,आ. शिरीष चौधरी, माजी आ. गुलाबराव पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ. बी. एस. पाटील,जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,आदींनी केले. अमळनेर नगरपरिषदेने या चौकाचे अधिकृतपणे महाराणा प्रताप चौक असे नामकरण करण्याचा ठराव केला असल्याची घोषणा झाल्याने सर्व समाजबांधवांनी जल्लोष करत कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले. यावेळी अॅड ललिता पाटील,पंस सभापती वजाबाई भिल,जिप सदस्य संगीता भिल, मार्केट संचालक विजय प्रभाकर पाटील,अॅड श्रावण ब्रह्मे,पराग पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, एल. टी. पाटील, अॅड. तिलोत्तमा पाटील, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडा, डॉ. संदेश गुजराथी, विक्रांत पाटील,मुन्ना शर्मा,प्रसाद शर्मा,राकेश मुंदडा,डॉ. राजेंद्र पिंगळे, संजय कौतिक पाटील, नितीन निळे, भाजपा शहराध्यक्ष शितल देशमुख,उमेश वाल्हे, प्रवीण पाठक,अनिल महाजन,भाऊसाहेब महाजन,डॉ सुमित सूर्यवंशी,प स सदस्य भिकेश पाटील,नटेश्वर पाटील,संदीप पाटील, बी आर बोरसे आदींची उपस्थिती होती.
नगरदेवळात जल्लोषात मिरवणूक
नगरदेवळा । महाराणा प्रताप यांच्या 478 व्या जयंती सोहळ्यानिमित्त येथील क्षत्रिय राजपूत समाजातर्फे महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन रोशन जाधव यांनी केले. यावेळी अरविंद परदेशी , पप्पूशेठ परदेशी , प्रदिप परदेशी , विनोद परदेशी, दगडू राऊळ , विनोद राऊळ, अशोक चौधरी, सोनू परदेशी, जितेंद्र परदेशी यांसह महाराणा प्रताप युवा मंच चे सर्व कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता परदेशी गल्लीतून संपूर्ण गावात उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली .शेवटी फटक्यांची आतिशबाजी करण्यात आली .मिरवणूक शांततेत पार पडली .यावेळी नगरदेवळा औट पोस्टचे विनोद पाटील व नरेंद्र विसपुते यांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.
श्रीसेवा डायग्नोस्टिक सेंटरतर्फे प्रतिमा पूजन
श्रीसेवा डायग्नोस्टिक सेंटर येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अंबाजी ग्रुपचे चित्रसेन पाटील, आरोग्य सभापती सोमसिंग राजपूत, आइबीएनचे पत्रकार प्रफुल्ल साळुंखे, जीभाऊ पाटील, स्टार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. तुषार राठोड, रयत क्रांती संघटना शहराध्यक्ष पप्पु पाटील, अजय शुक्ला, खुशाल पाटील, हेमंत पाटील, अनिल कोल्हे, शशिकांत भामरे, मुन्ना राजपूत, कल्पेश पाटील, निलेश पाटील, राहुल पाटील आदी उपस्थित होते.