जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

0

जळगाव । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली. यावेळी तालुकास्तरीय कवायत मैदानावर पोलिसांची परेड करून पोलीस व गृहरक्षक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापना दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक उपक्रम, खेळ, शिक्षण, सामाजहिताचे काम करणार्‍या व्यक्तींना पारीतोषिक देवून सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकिय व खासगी संस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

आमदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण
चाळीसगाव । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी आमदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते पोलीस परेड कवायत मैदानावा ध्वजारोहण उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रगीत आनंदीबाई बंकट विद्यालयाच्या श्रावणी गितेश कोटस्थाने आणि स्नेहल बाळासाहेब सापनर या विद्यार्थिनींनी म्हटले. ध्वजारोहणानंतर आमदार उन्मेशदादा पाटील यांना पोलीस व गृहरक्षक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. राष्ट्रध्वजास वंदन व संचलन समारंभानंतर आमदार उन्मेश पाटील यांनी सर्व उपस्थितांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पचायत समिती सभापती सौ.स्मितल बोरसे, उपसभापती संजय भास्कर पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगर सेविका अलका गवळी, नगरसेवक संजय पाटील, आनंद खरात, अरुण आहिरे, रमेश शिंपी, स्वातंत्र्य सैनिक, तालुका प्रशासनाच्या वतीने चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, तहसिलदार कैलास देवरे, न.पा. मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, पोनि आदिनाथ बुधवंत यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच तहसिल कार्यालयातील सर्व नायब तहसिलदार, कर्मचारी, विविध शासकीय विभागातील अधिकारी- कर्मचारी, नागरिक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

भाजयुमोतर्फे ग्रामीण रूग्णालयात स्वच्छता
चाळीसगाव । भारतीय जनता युवा मोर्चातर्फे चाळीसगाव येथे ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आमदार उन्मेश दादा पाटील, विश्वास भाऊ चव्हाण, दिनेशभाऊ बोरसे, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, राजू अण्णा चौधरी, संजय रतनसिंग पाटील, मानसिंग राजपुत, बापू अहिरे, प्रभाकर भाऊ चौधरी, तसेच भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय मराठे, उपाध्यक्ष मनोज पाटील, विशाल करडा, अमोल चौधरी, जितु नेरकर, गौरव चौधरी, अरविंद गोत्रे, विक्की देशमुख, संदीप राजपुत, अनु.सूचित जाती जमाती अध्यक्ष सुबोध वाघमारे, जिल्हा चिटणीस अमोल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल चौधरी, संपर्क प्रमुख रोहन पाटील, व्यापारी आघाडीचे अमित सुराणा, किशोर रणधीर, सर्व भाजपा पदाधिकारी, नगरसेवक ग्रामीण रुग्णालय स्वच्छतेसाठी श्रमदान केले. सुनील निकम सर व सचिन दायमा यांनी सूत्रसंचालन केले.

ग्रामसभेकडे ग्रामपंचायत सदस्यांनी फिरवली पाठ
अडावद । शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारी अडावदची ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. कारण 1 मे रोजी देशाच्या प्रत्येक ग्रामपंचायत ने ग्रामसभा बोलवली व काही महत्वाचे ठराव करून घेतले पण अडावदकरनां या ग्रामसभे पासून का वंचीत ठेवण्यात आले हे काही समजण्यासारखे आहे .ग्रामसभा न घेण्या मागे काही गौड बंगाल तर नाही ना? किंवा असे काही ठराव करावयाचे असतील जे अडावद ग्रामस्थांना समजून देण्यासारखे असतील आणि त्यामागे काही गौड बंगाल असू शकतो अशी गावात सुज्ञ नागरिक चर्चा करीत आहे. याबाबत ग्रामविस्तार अधिकारी यांना विचारले असता की, आजची ग्रामसभा का घेण्यात आली नाही त्यावर त्यांनी म्हटले की आमच्या पर्यंत शासनाचे परिपत्रक आले नाही व पाहिजे तशी तयारी सभेसाठी नव्हती म्हणून आम्ही सभा घेतली नाही. 15 ते20 तारखे दरम्यान सभा घेऊ असे ते म्हणाले.

झेंडावंदन कार्यक्रमास अनेकजण गैरहजर
अडावद ग्रामपंचायत मध्ये 17 सदस्य आहेत त्यातील 2सदस्य हे अपात्र ठरले आहे 1महिला सदस्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तरी 14 सदस्यांपैकी सरपंच भारती सचीन महाजन, उपसरपंच संजय गोकुळ महाजन, जहांगीर पठाण, दिनकरराव देशमुख, आसाराम कोळी, विजीता हरीश पाटील, हनुमंत महाजन या सदस्यांनीच झेंडावंदन कार्यक्रमास हजेरी लावली. ग्रामसभेबाबत ग्रा प प्रशासनामध्येच अनास्था दिसत असल्याने नागरिकांच्या प्रश्नांचे काय?असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे.

चितेगाव ग्रा.पं.ला ‘स्मार्टग्राम‘ पुरस्कार
चाळीसगाव । ग्रामीण विकासाची जाण असलेलं नेतृत्व गावाला लाभल्यास गावाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही त्यातच ग्रामीण विकासाची आवड असलेल्या घराण्यात जन्म झाल्याने नेतृत्व गुण अबाधित राहतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे चितेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल भोसले तर त्यांना ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची माहिती व जाण असलेले कार्यक्षम ग्रामसेविका सविता पांडे यांची जोड असल्याने स्मार्ट ग्राम म्हणून तालुक्यातील चितेगाव ग्रामपंचायतीचा लौकीक झाला प्रशस्तीपत्र व 10 लक्ष रुपयांचा धनादेश देऊन 1 मे रोजी राज्याचे कृषी व पणन मंत्री ना.सदाभाऊ खोत यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तसेच सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते. ही बाब चाळीसगाव तालुका वासियांसाठी भूषणावह म्हणावी लागेल. गावात सुखसोयी सुविधा कशा पुरविता येतील तसेच लोकांना योजनांची माहिती व विविध शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल याकडे सरपंच अमोल भोसले यांचे जाणीवपूर्वक लक्ष असते. सामान्यांच्या समस्या कशा सुटतील यावर नेहमी सरपंच अमोल भोसले, उपसरपंच किरण जाधव, ग्रामसेविका सविता पांडे आणि सहकारी प्रयत्नशील असतात. तंटामुक्त गाव होण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रृत आहेच.

त्याबरोबर ग्राम स्वच्छतेवर भर देऊन 100 टक्के हगणदारीमुक्त करण्याचे काम ग्रामपंचायतीने केलेले आहे. संगणकीकृत ग्रामपंचायत आणि प्रशस्त इमारत लक्ष वेधून घेते. गावाला भासत असलेल्या पाणीटंचाई निवारणार्थ रेनवॉटर हॉर्वेस्टींग गाव सतत प्रकाशमय असावे. यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी दिवे व आवश्यक असेल त्या ठिकाणी काँक्रिटीकरण रस्ते मिळालेल्या निधीतून करण्याचा मनोदय तसेच चितेगाव ग्रामपंचायतीस मिळालेला पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचे फळ नसून यासाठी त्यांना ग्रामसेविका सविता पांडे,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव निकम, तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य मिळत असल्याचे सरपंच अमोल भोसले यांनी स्पष्ट केले.

धानोरा ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव
चोपडा । महाराष्ट्रदिनी झालेल्या महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करून तो मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कीर्ती किरण पाटील होत्या. धानोरा गावात जवळपास पाच ते सात ठिकाणी अवैध दारू विक्री होते. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. गावात दारूबंदी करावी अशी महिलांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयात महिला ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी इंदिरानगरातील छायाबाई विकास कोळी यांनी अवैध दारू विक्रेत्याकडून सात देशी दारूच्या बाटल्या जमा करून, त्या सभेत अध्यक्षांच्या टेबलावर ठेवल्या. यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस शिपाई रवींद्र सोनार यांना अवैध दारू विक्रेत्यांची नावेही दिली. यानंतर सभेने दारूबंदीचा ठराव केला. दारूबंदीच्या ठरावासह सभेत पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सभेला पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील, ग्रा.पं.सदस्या रेखा महाजन, अंजनाबाई साळुंखे, छबाबाई साळुंखे, निर्मलाबाई इंगळे, लक्ष्मीबाई कोळी, इंदूबाई कोळी यांच्यासह जवळपास 100 ते 150 महिला उपस्थित होत्या.

भडगाव, कजगाव आरोग्य केंद्रात राबविले स्वच्छता भारत अभियान
भडगाव । 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ’स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत भारतीय जनता युवामोर्चा कडून भडगाव रुग्णालय व कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान राबवून डॉक्टरांचा पुष्प देवुन सन्मान करण्यात आला. रुग्णालय परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झाडू घेऊन साफसफाई केली. तसेच नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आहावान करण्यात आले. यावेळी भाजपायुमोचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, युवामोर्चा तालुकाध्यक्ष नितिन महाजन, मुकेश महाजन, समाधान कोळी, शेखर पाटील, भैय्या महाजन, बंडु महाजन, जितु पाटील, शुभम सुराणा, गोपी महाजन, योगेश शिंपी, गौरव कोळी, सुरेश महाजन, अमोल पाटील, वैभव महाजन आदी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता.

अमळनेरात आ. शिरीष चौधरींच्या हस्ते ध्वजारोहण
अमळनेर । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते अमळनेर तहसील कार्यालय प्रांगणात उत्साहात झाला. यावेळी उप विभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसिलदार प्रदीप पाटील, कर्नल अनिल जॉन, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, पोलिस निरीक्षक विकास वाघ, शासकीय कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.