धुळे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात महिलांच्या छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. महिलांना त्यांच्या घरात जावून धमकावणे, विनयभंग करणे यासारख्या घटना घडत आहेत. पोलीसांचा धाक राहिला नसल्याचे यातून दिसून येत आहे. महिलांचा विनयभंग करतांना त्यांनी विरोध केल्याने संशयितांनी त्यांच्या महिलांच्या कुटूबियांनाच मारहाण करण्याची घटना घडली आहे. चांदे येथील महिलेने आपल्या पती व सासु-सासर्यांना आपबिती सांगितल्यावर याचा जाबा संशयितास विचारल्यावर संशयिताने व त्याच्यासोबत इतरांनी पिडीत महिलेला व तिच्या कुटूबियांनी मारहणा केली. मारहणा करणार्यांमध्ये महिलांचा समावेश होता. तर भदाणे गावातील पिडीत महिलेनेही आपल्या कुटूंबीयांना झालेला प्रकार सांगितल्याने त्यांनी संशियातास जाब विचारला. याचा राग येवून संशियाताने थेट पिडीतेच्या घरात घुसून कुटूबियांना मारहाण करण्यापर्यंत या समाजकंटाची मजल गेली आहे. या घटनांमधून गुन्हेगारांमध्ये पोलीसांचा वचक गुन्हेगारांवर राहिलेला नसल्याचे दिसत आहे.यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांनी कोणाकडे दाद मागावी असा चर्चा महिलांमध्ये रंगलेला दिसत आहे.
मारहाण करणार्या दोघांना अटक
विनयभंगाची दुसरी तक्रार नवे भदाणे ता.धुळे येथे राहणार्या 23 वर्षीय विवाहितेने तालुका पोलिसात दिली आहे. गावातील धनराज रामा मारनर हा गुरूवार 16 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता फिर्यादी महिलेच्या घरात घुसला आणि त्याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. सदरचा धक्कादायक प्रकार तिने तिच्या घरच्यांना सांगितला.त् यांनी जाब विचारला असता धनराज मारनर, रामा नारायण मारनर, सोजाबाई रामा मारनर, गोकुळाबाई धनराज मारनर यांनी फिर्यादी महिला आणि तिच्या सोबतच्या एका महिलेला मारहाण करुन जखमी केले. तालुका पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दोघां आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी महिलांना देखील लवकरच अटक करण्यात येणार आहे.
जाब विचारला म्हणून मारहाण
घरात घुसुन महिलांवर बळजबरीचा प्रयत्न करुन पिडीत महिला आणि त्यांच्या कुटूंबियांना मारहाण झाल्याच्या तक्रारी धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. चांदे ता.धुळे येथे राहणार्या 22 वर्षीय तरुण विवाहितीने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील संदीप उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील याने पिडीत महिलेच्या घरात घुसून तिला मागच्या रुममध्ये ओढत नेले. तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. दोन वेळा त्याने हे कृत्य केले. हा प्रकार तिने तिचा पती आणि सासु सासर्यांना सांगितला. जाब विचारणार्या या तिघांना आणि फिर्यादी महिलेला संदीप पाटील,वसंत दगा पाटील, दुर्गाबाई वसंत पाटील यांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याचे अंगावरील कपडे फाडले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास एएसआय आर.जी.साळवे करीत आहेत.
थाळनेर पोलिसात तक्रार
तिसरी तक्रार शिरपूर तालुक्यातीलहोळनांथे येथील 30 वर्षीय महिलेने थाळनेर पोलिसांकडे केली आहे. दि.19/6/2017 रोजी दुपारी 4 वाजता फिर्यादी महिला ही वंदनाबाई महेंद्र जाधव हिच्या घराजवळून जात असतांना वंदनाबाई आणि तेजपाल महेंद्र जाधव या दोघांनी तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. फिर्यादी महिलेने समजविण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाण केली.तिच्या अंगावरील साडी धरुन तिचे केस ओढले, आरोपींविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास हे.कॉ. बापू पाटील करीत आहेत.