जळगाव | काहीशा कमी झालेल्या थंडीची तीव्रता येत्या रविवारनंतर अधिक वाढणार अाहे. शनिवारपासूनच उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांचा वेग ताशी १७ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता अाहे.
रविवारी किमान तापमान अवघ्या ८ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज अाहे. उत्तर महाराष्ट्रात विशेषत: जळगाव जिल्ह्यात बुधवारी किमान तापमान १२.२ अंशांवर हाेते. वाऱ्याचा वेग ताशी ५ ते ६ किलाेमीटर असल्याने दुपारी ३० अंशांपर्यंत वाढलेल्या कमाल तापमानामुळे उन्हाचा चटका जाणवत हाेता.
गुरुवारपासून वाऱ्याचा वेग वाढेल. शुक्रवारी ताशी ११ किमी, शनिवारी १३ किमी तर रविवारी वाऱ्याचा वेग ताशी १६ ते १७ किमीपर्यंत वाढू शकताे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रविवारी दिवसाही गारठा जाणवेल. त्यामुळे कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस ते किमान तापमान ८ अंश सेल्सअसपर्यंत राहणार अाहे. दाेन दिवस या वाऱ्यांचा प्रभाव वसेल.