जिल्ह्यात रास्ता रोको करत राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

0

अमळनेर, पाचोरा, जामनेर व धरणगाव येथे शासनाचा केला निषेध

जळगाव । जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी तालुकास्तरीय विभागावरील प्रांताधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिय्या मांडून कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील मंत्र्यांवर जोरदार प्रहार करून शेतकरी बांधवांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आले. अमळनेर, पाचोरा, जामनेर, धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादीतर्फे शासनाचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील व तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कार्यालयापासून ढोल ताश्यांच्या गजरात शेकडो कार्यकर्ते प्रांत कार्यालयासमोर दाखल होऊन रस्त्यावर ठिय्या मांडत शासना विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यातही बसलेले सरकार हे फडणविस सरकार नव्हे फसवणूक सरकार असल्याचे मत संजय गरूड यांनी जामनेर तालूका राष्ट्रवादी कॉग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाच्या वेळी मांडले. धरणगाव येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृवाखाली धरणगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला. तर पाचोरा येथे राष्ट्रवादी कार्यालय ते तहसील कार्यालयदरम्यान माजी आमदार दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पायी मोर्चा काढण्यात आला.

काय म्हटले निवेदनात
या हल्लाबोल आंदोलनात शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, युवा वर्ग, महिला इत्यादी सामाजिक घटकांचे प्रश्न सोडविण्यात केंद्रातील ’नरेंद्र’ सरकार व राज्यातील ’देवेंद्र’ सरकार सपशेल अपयशी ठरत असून राज्यातील या घटकांविषयी सरकारच्या उदासीन धोरणाविरोधी हा एल्गार राष्ट्रवादी कडून करण्यात आला. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, वीजबिल माफ झालेच पाहिजे, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. सदर निवेदनात राज्यात आज अनेक प्रश्न अस्तित्वात आहेत, यात प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी, महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेरोजगारी यासारख्या गंभीर समस्या राज्याला भेडसावत असतांना हे सरकार व मंत्री ज्या असंवेदनशील प्रकारे राज्य कारभार हाकतायत तो म्हणजे निर्लज्ज प्रकारचाच असल्याचं दिसत आहे. राज्याचे मंत्री बोलतांना, वागतांना तारतम्य बाळगताना दिसत नाही येत. राज्य डबघाईला आलेले असून राज्याची तिजोरीतील जनतेचा पैसा हे सरकार स्वतःच्या जाहिराती करण्यात वाया घालवत आहेत. या सबंध प्रकारांमुळे राज्यातील जनता त्रस्त व कंटाळली आहे. म्हणून जनतेच्या हितापोटी व कल्याणासाठी,जनतेला या सरकारची सामान्य माणुसविरोधी प्रतिमा दाखविण्यासाठी व सरकारला जाग यावी म्हणून हे हल्लाबोल आंदोलन राष्ट्रवादीतर्फे करण्यात आले असल्याचे स्पष्ट करून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या.

अमळनेर । येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिय्या मांडून जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील व तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कार्यालयापासून ढोल ताश्यांच्या गजरात शेकडो कार्यकर्ते प्रांत कार्यालयासमोर दाखल होऊन रस्त्यावर ठिय्या मांडत शासना विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना 12 नोव्हेंबर रोजी नागपुर येथे महामोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात अमळनेर तालुक्यातून हजार ते पंधराशे कार्यकर्ते जाणार अशी घोषणा केली. जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री यांचेवर प्रहार करून त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले, याचा खुलासा करावा, असे आव्हान देत शासनाचा धिक्कार केला. तसेच तिलोत्तमा पाटील व शिवाजीराव पाटील यानींही मनोगत व्यक्त करून निषेध नोंदविला. यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता व दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या विनंतीनुसार कार्यकर्ते प्रांत कार्यालयात दाखल झाले. मात्र तेथे प्रांत व तहसीलदार निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

हल्लाबोल आंदोलनात यांनी घेतला सहभाग
या आंदोलनात जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवक शहराध्यक्ष बाळु पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, ग्रंथालय सेलचे श्री उमेश पाटील, ग्रंथालय सेलच्या सौ.रिता बाविस्कर, अलका पवार, पं.स.चे सदस्य विनोद जाधव, निवृत्ती बागुल, प्रविण पाटील, प्रा.सुरेश पाटील, रणजित पाटील, सुभाष पाटील, शिवाजीराव पाटील, विनोद कदम, अ‍ॅड.यज्ञेश्वर पाटील, नरेंद्र बाळु पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, गजेंद्र पवार, महेंद्र पाटील, राजेंद्र पवार, रणछोड पाटील, पांडुरंग पाटील, नंदकिशोर पाटील, भास्कर सोनवणे, जितेंद्र पाटील, हिंमत पाटील, अर्जुन पाटील, संभाजी पाटील, सुनिल शिंपी, भुषण भदाणे, विपीन पाटील, दर्पन वाघ,उमेश सोनार, नंदलाल पाटील, प्रकाश महाजन, नितीन भदाणे, देवीदास देसले, उमेश पवार, संजय पाटील, अनिल पाटील, बाबुलाल पाटील, शामकांत पाटील, सुधिर पाटील, किरण पाटील, अरुण शिंदे, प्रकाश पाटील, भैय्यासाहेब पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील, रामचंद्र पाटील, पंकज पाटील, सुभाष जगदेव, विजय पाटील, सुरेश पाटील,किरण पाटील अल्पसंख्यांक सेलचे आरिफ पठाण, जुनेद शेख, मुशीर शेख, अबीद अली अहमद अली सैय्यद सर्व सेलचे तालुकाध्यक्ष व महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मा ेठ्या प्रमाणात सहभागी होते.

फडणविस सरकार नव्हे, फसवणूक सरकार – संजय गरूड
जामनेर । केंद्रासह, राज्यात भाजपा सरकार सत्तेवर असून देशाचा काही एक विकास न करता फक्त आपली खडगी भरण्यात हे सरकार मशगुल असून राज्यातही बसलेले सरकार हे फडणविस सरकार नव्हे फसवणूक सरकार असल्याचे मत संजय गरूड यांनी 30 नोव्हेंबर रोजी जामनेर तालूका राष्ट्रवादी कॉग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाच्या वेळी मांडले. मोर्चाला डिंगबर पाटील, प्रदीप लोढा, राजेंद्र पाटील, अभिषेक पाटील, किशोर पाटील, अ‍ॅड. ज्ञानेश्वर बोरसे, भगवान पाटील, माजी उपनगराध्यक्ष जावेद मुल्लाजी, माजी नगरसेवक मुकूंदा सुरवाडे, जितेश पाटील, प्रल्हाद बोरसे, ज्योती पाटील, संगिता सुर्यवंशी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. दरम्यान गरुड यांनी बोलतांना सांगितले कि, सरकारकडून मोठमोठया जाहीराती करून गवगवा केला जात आहे. मात्र कृतीत शुन्य असल्याचा आरोप करीत गेल्या 3 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर एक रुपयाही शिष्यवृती जमा झाली नाही. सर्व सामान्यांसाठी जगण महाग झाल असून मरण स्वस्त झाले आहे. तर तालूक्याला महाजनांच्या रुपाने मंत्रीपद मिळाले आहे. मात्र, महाजन आपले कामे सोडून बिबट्या मारायला निघाले आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी महाजनांना मारला. डि.के.पाटील, प्रदीप लोढा, अ‍ॅड.ज्ञानेश्वर बोरसे, भगवान पाटील, किशोर पाटील यांनीही आपले म्हणणे मांडून सरकारचा निषेध केला.

धरणगाव तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा
धरणगाव । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृवाखाली धरणगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला. शेतकर्‍यांना सम्पूर्ण कर्ज माफी, कापसाला गुजरात प्रमाण 500 रुपये बोनस द्यावे, धरणगाव तालुक्यातील कपाशी पिकावर झालेल्या बोड अळीचा प्रादुर्भावमुळे शेतकर्‍यांना नुकसान शासनानने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. कापसाला योग्य भाव द्यावा, अशा प्रकारे मागणी केली आहे. यावेळी उपस्थित होते. माजी मंत्री ना. गुलाबराव देवकर, डॉ. मिलिंद डहाळे, वसंतराव भोलाने, मोहनभाऊ पाटील, अमोल हरपे, निलेश चौधरी, विजय पाटील, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाचोर्‍यात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन
पाचोरा । शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे गुरुवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कार्यालय ते तहसील कार्यालयदरम्यान पायी मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या निषेधार्थ लोकप्रतिनिधींनी मनोगतातून टिकेची राळ उठवली. नायब तहसीलदार उमाकांत तडवी यांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार दिलीप वाघ, पीटीसी चेअरमन संजय वाघ, तालुकाध्यक्ष शालिग्राम मालकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय वाघ, नितीन तावडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.