जिल्ह्यात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

0

धुळे । शहरासह जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांची वेशभूषा करून लोकमान्य टिळकांना अभिवादन केले. टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त वकृत्त्व स्पर्धा, निंबध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर काही शाळांमध्ये एकपात्री नाटक, नाटीका सादर करून टिळकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तसेच राजकीय, शैक्षणिक व सामाजिक संस्थांतर्फे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

निबंध स्पर्धेचे आयोजन
पिंपळनेर । येथील इंदिरा गांधी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आल. याप्रसंगी अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एम. व्ही. बिरारी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक जयेश राजाराम मराठे व कुणाल सुरेंद्रराव गांगुर्डे उपस्थित होते. यावेळी वकृत्त्व स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. स्पर्धेचा विषय लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य असा होता. तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला शिवजयंती, गणेशोत्सव व स्वदेशी वस्तुंचा आग्रह यावर आधारीत सुंदर वेषभुषेसह व अभिनयासह नाटीका सादर केली. यानंतर पी. डी. सैंदाणे, एम. डी. मराठे, के. ए. शेळके, जे. एन. मराठे यांनी भाषणे झालीत. वकृत्त्व स्पर्धेचे व नाटीकेतील उत्कृष्ट अभिनय करणार्‍या विद्यार्थ्यांना श्रीमती पी. जी. पाटील, शेवाळे मॅडम, सी. एस. अहिरे, श्रीमती एम. एस. मराठे, व्ही. पी. मोरे यांनी प्रशिक्षण दिले. सूत्रसंचालन प्रा. पी. आर. खैरनार, प्रा. ए. आर. सुर्यवंशी यांनी केले तर आभार जे. एन. मराठे, ए. आर. पाटील यांनी मानले.

वरखेडे ग्रामपंचायत कार्यालयात टिळक, साठे जयंती
वरखेडे । येथे ग्रामप्रंचायत कार्यालयात लोकमान्य टिळक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच विलास धनगर, उपसरपंच विजय पाटील, सदस्य संदिप पटेल, पप्पु मराठे, शांताराम चौधरी, अनिल निकम, सुदाम लोखंडे, भरत लोखंडे, दादा लोखंडे, चुवाराज लोखंडे, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.

एकपात्री अभिनयाने केले मंत्रमुग्ध
शिरपूर । शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका सौ.रंजनाताई सोनवणे, महेंद्र परदेशी, अमोल सोनवणे, पालक प्रतिनिधी सौ. पौर्णिमा राजपूत, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. इयत्ता 4 थी वर्गातील वेदांत राजपूत याने लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत मी टिळक बोलतोय एकपात्री नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.प्रथम गट :बालवाडी ते 2 री द्वितीय गट: 3 री व 4 थी. प्रथम गटात 60 तर द्वितीय गटातून 68 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. इयत्तनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. अविनाश राजपूत व श्रीमती वंदना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विदयलयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना धाडसी होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात महेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या धाडसी जीवन प्रवासा बाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गजेंद्र जाधव व प्रकाश ईशी यांनी केले. आभार अनिल माळी यांनी मानले.

हस्ती स्कूलमध्ये प्रश्‍नमंजूषा
दोंडाईचा । हस्ती चॅरिटेबल ट्रस्टसंचलीत हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅन्ड ज्यु.कॉलेज दाऊळ शिवार दोंडाईचा येथे मंगळवारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यातआली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन इ.9वी तील विद्यार्थिंनीपूर्वापवार व कृतिका पवार यांनी केले. तर सामाजिकशास्त्र विभागाचे शिक्षक विलास पाटील यांनी लोकमान्य टिळकयांच्या जीवन चरित्रावर प्रकाश झोत टाकला. प्राचार्य एस.एन.पाटील यांनी लोकमान्य टिळकयांच्या अनुभूतीसंदर्भात उद्बोधनपर मार्गदर्शन केले. टिळक यांनी ब्रिटीश शिक्षण पद्धतीस विरोध करुन भारतीय शिक्षणपद्धतीच श अवलंब भारतीयांनी करावा असे त्यांनी सांगितले. विद्यालयातील युक्ती अठावाल, मृदूला महाजन, क्षितीज गोस्वामी, रोशन पावरा, अंजली पावरा यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली. तर पूर्वा पवार आणि रोहन अठावाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर प्रश्‍न विचारुन उत्तरे काढून घेतली. कार्यक्रमास सर्व सहकारी शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

एच.आर.पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
शिरपूर । येथील एच.आर.पटेल कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली असून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या सौ.एम.एस.अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक पी.आर.साळुंखे, सी.एन.पाटील, व्ही.एस.ईशी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी सी.एन.पाटील यांनी केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेत 20 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मनिषा पवार हिने प्रथम क्रमांक, चेतना माळी व्दितीय, मनिषा मराठे तृतीय व प्रिंयका वाघ हिने उत्तेजनार्थ अक्षिस पटकावले. एम.आय.पठाण यांनी लोकमान्य टिळका यांच्यावर आपले विचार व्यक्त केले. व्ही.एस.ईशी यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर विचार स्पष्ट केले. सूत्रसंचालन सी.एन.पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन ए.एस.जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी आर.एन.साळुंखे, डी.यु.चौधरी यांनी कामकाज पाहिले.

जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांचे अभिवादन
धुळे । लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरूडे, जिल्हा नियोजन अधिकारी एम.आर.वाडेकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे आदि उपस्थित होते.

वरवाडे आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना अभिवादन
शिरपूर । वरवाडे शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गोपाल पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल शिंदे यांनी केले. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर.उपशिक्षिका श्रीमती वैशाली सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना टिळकांचा जीवनपरिचय व बालपण याबद्दल माहिती दिली. तसेच अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपरिचय स्पष्ट करून दिला.श्रीमती कविता सोनवणे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रीमती एम.ई.पाटील, कामिनी देवरे, योगिता पाटील, गजानन पाटील, एस.एम.जाधव, विद्या बारी, दिनेश पावरा, प्रविण जगदेव यांनी प्रयत्न केले.