जळगाव । 30 जून रोजी मान्सून केराळात दाखल झाल्यानंतर राज्यातील हवामानात बदल झाले. मान्सुनच्या आगमनानंतर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झालेले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्याभरात जोरदार पाऊस झाला आहे. तीन दिवसापूर्वी जिल्ह्यातील सरासर पर्जन्यमान हे 3.7 मीमी होते. मात्र यात वाढ झाले असून जिल्ह्यात 21.8 मि.मी.पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून दमट वातावरण असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला आहे.
तालुकानिहाय पर्जन्यमान
जळगाव परिसरातील शिरसोली, दापोरा, वावडदा या गावांत बुधवारी जोरदार पाऊस झाले. जळगाव तालुक्यात 36.6, जामनेर 2.3, एरंडोल 29.5 ,धरणगाव 49.8, भुसावळ 18.9, यावल 24.0, रावेर 25.6, मुक्ताईनगर 8.2, बोदवड 3.0, पाचोरा 13.7, चाळीसगाव 10.6, भडगाव 4.3, अमळनेर 14.8, पारोळा 36.2, चोपडा 49.9 मिमी असा एकुण 327.5 मिमी पाऊस झाला आहे. सरासरी पावसाच्या 21.8 मिमी नोंद करण्यात आले आहे. सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेती कामाला वेग आले आहे. शेतकर्यांनी शेती लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप महाराष्ट्रात मान्सुन दाखल झाले नसल्याने बहुतांश शेतकर्यांनी लागवड करणे टाळले आहे.