नंदुरबार। येत्या काळात जिल्ह्यात सर्वत्र भाजपा ओबीसी मोर्चा शाखा लावण्यात येणार, असे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी केले. वावद (ता.नंदुरबार) येथे रविवार 6 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे फलक अनावरण मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विजय चौधरी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे.
यामुळे नागरीकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे गावागावात जावून लोकांच्या अडचणी समजून घेण्यात येतील. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न ओबीसी मोर्चाद्वारे आपल्याला करावयाच्या आहेत. ग्रामस्थांतर्फे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात वावद येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा ओबीसी मोर्चात प्रवेश केला.फलक अनावरण प्रसंगी ओबीसी मोर्चाचे कोषाध्यक्ष खुशाल चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुनिल वाघरी, प्रदेश सचिव पंकज जैन, दिनेश मोहिते, कामगार आघाडीचे समीर हुसेन, वावद शाखा अध्यक्ष रमजान शाह, उपाध्यक्ष परशुराम जाधव, सचिव पावबा राजपूत, सदस्य परशुराम भील, साहिल पिंजारी, मुस्लिम मंचचे इरफान शेख, रफीक धोबी आदी उपस्थित
होते.