नंदुरबार येथे मंगळबाजारातून मुख्य मिरवणुकीस सुरूवात ; ढोल-ताशांच्या गजराने निनादले शहर
नंदुरबार । गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…. श्रींच्या या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात शहरातील पहिल्या टप्प्यातील गणपतींच्या विसर्जन मिरवणुका जिल्ह्यात काढण्यात आल्या. नंदुरबार शहरातील विविध मंडळाच्यावतीने गुरूवार 31 आगस्ट रोजी म्हणजे सातव्या दिवशी श्री चे विसर्जन करण्यात आले. यानिमित्ताने सकाळपासूनच सर्वत्र उत्साह संचारला होता. घरगूती गणपतींचे दुपारी एक वाजेपर्यंत विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले. सायंकाळ चार वाजेनंतर मुख्य मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. सर्व मंडळांचे गणपती सुभाष चौकात आल्यानंतर मंगळ बाजारापासून खर्या अर्थाने मुख्य मिरवणुकांना प्रारंभ झाला. ढोलताशांच्या प्रचंड गजर… गुलालाची उधळण… आणि मोरयाचा जयघोषाने अवघी नंदनगरी दुमदुमून निघाली होती. मिरवणुकीत हातात भगवाध्वज घेवून गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या लयबद्ध हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
रंगावली नदीपात्रात रात्री आठ वाजेच्या आत विसर्जन
नवापूर । शहरात सातव्या दिवशी 27 गणेश मंडळानी श्रीं चे ढोल ताशांता गजरात रंगावली नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. रात्री आठ वाजेचाआत सर्वच मंडळानी विसर्जन केले. सकाळी 11 वाजेनंतर गणेश मंडळ विसर्जंनासाठी शहरातील मेन रोडवर गटागटाने एक एक येऊन मुख्य मिरवणुकीत सामील झाली होती. सातव्या दिवशी जास्त करुन बालगोपाल मंडळीची लहान मंडळे सहभागी झाली होती. ग्रामीण भागातील युवक मिरवणुकीत नाचण्यासाठी आले होते. पोलीसांतर्फे मेन रोडवर दोघ बाजुने बंदिस्त करुन मुख्य मिरवणुक मार्गावरुन वाहतुक पुर्णता बंद करण्यात आली होती. यामार्गांकडे निघणार्या रस्त्यांवर बँरिकेटस लावुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार प्रमोद वसावे मिरवणुक मार्ग,मंडळे याबाबत अपडेट घेत होते तर पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपुत यांनी मिरवणुक मार्गाचा आढावा घेऊन त्यानुसार सुव्यवस्थित नियोजन केल्याने कायदा व सुव्यवस्था राहुन मिरवणुक सुरळीत व उत्साहात पार पडली .
विविध सामाजिक संस्थांचा समावेश
शहरात मिरवणुक मार्गावर जास्त होल्टचे पथदिवे लावुन ज्यादा प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीत वनिता विद्यालय गणेश मंडळाचा मुलींचे नुत्य आकर्षक व लक्षवेधी ठरले. डी.जे. आवाजात,मुलींचा आकर्षक,पेहराव व नृत्य एकुणच सदर नृत्य पाहण्यासीठी लोकांनी एकच गर्दी केली होती. मिरवणुकीत डाँक्टर असोसिएशन गणेश मंडळातील मिरवणुकी सालाबादा प्रमाणे नाविण्य पुर्ण ठरली. नवभारत हौसिंग गणेश मंडळ, दगडी चाळचा राजा हे बाल गोपालाचे मंडळ वाजत गाजत मिरवणुकीत रंग भरुन गेलेत. दरम्यान पोलीस अधीक्षक संजय पाटील यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपुत यांच्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात 16 सीसीटिव्ही कँमेरातुन संपुर्ण शहरात मंडळे, मिरवणुक,व इतर हालचालीवर पोलीस नजर ठेवुन आहेत. मिरवणुकीचे संपुर्ण व्हिडीओ शुटींग करण्यात येत होते. गुलालाची उधळण आणि ढोल ताशाचा गजरात बाप्पाला पुढचा वर्षाचा निरोप देत गणेश भक्त उत़्सवात तल्लीन झाले होते.
कडकडीत उन्हात निघाली मिरवणूक
गणपती बाप्पा मोरया पुढचा वर्षी लवकर याचा निरोप सातव्या दिवसाचा श्रीला मोठ्या भक्ती भावाने दिला. मिरवणुकीत रस्ते गुलालाने रंगले होते. मिरवणुकीत गणेश भक्तासांठी यावेळी कडी खिचडीचे जेवण ठेवण्यात आले होते. सात दिवश बाप्पा सोबत आलेला पाऊस काल पासुन गायब झाला. आज कडकडीत ऊन्हात बाप्पांची मिरवणुक निघाली होती. मुख्य मिरवणुकीत भाजीपाला गणेश मंडळ,छोटा बाबा गणेश मंडळ,डॉक्टर असोशिएशन गणेश मंडळ,युवा ग्रुप गणेश मंडळ,साईराज गणेश मंडळ,अग्रवाल समाज गणेश मंडळ,एकलव्य गणेश मंडळ,वनिता विद्यालय गणेश मंडळ,दत्त गणेश मंडळ,रत्न कलाकर गणेश मंडळ,शेपालीपार्क गणेश मंडळ,भवानी चौक गणेश मंडळ,एक दत्त गणेश मंडळ, सर्व लहान लहान मोठे मंडळ मिळुन 16 गणेश मंडळ तसेच सिध्दी विनायक गणेश मंडळ,ग्रामीण मध्ये 8 गणेश मंडळ असे 24 गणेश मंडळाचा श्री चे विसर्जन करण्यात आले. तसेच केलपाडा,सुळी,अंजने,देवलीपाडा,कोलदा,उमराण या ग्रामीण आदिवासी भागात एक गाव एक गणपती चे विसर्जन उत्साहात झाले. पुर्ण दिवस पोलीस निरिक्षक विजयसिंग परदेशी, सहायक पोलीस निरिक्षक दिलीप बुवा,पोलीस उप निरिक्षक दिपक पाटील,संतोष भंडारी,संगिता कदम,तातु निकम,बबन सुर्यवंशी यांचा सह होम गार्ड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
अभिनव विद्यालयांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; लेझीम पथकांनी वेधले लक्ष
शहाद्यात 13 गणेशमंडळांनी केले विसर्जन
शहादा शहरातील दुसर्या टप्प्यातील गणेश विसर्जन सातव्या दिवशी दुपारी 1 वाजेपासुन सुरु झाले दुसर्या टप्प्यातील सातव्या दिवशीचे गणेश विसर्जनात एकूण 13 गणेश मंडळानी सहभाग नोंदवला. विसर्जन मिरवणुका महात्मा गांधी पुतळा पासुन सुरु झाल्या रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असल्याने गणेश भक्तामध्ये उत्साह होता. काहींनी मिरवणुकीचा माध्यमातुन सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे फलक आपल्या ट्रॅक्टरवर लावले होते. जे 13 गणेश मंडळे विसर्जन करणार आहेत. त्यात साईबाबा मित्रमंडळ , साईसरदार गणेश मंडळ महाराणा प्रताप मित्रमंडळ, भावसार मित्रमंडळ,संत गोरा कुंभार , गुरुदत्त मित्रमंडळ, राजा नवयुवकमंडळ , संत नामदेव महाराज मंडळ , ब्राह्मण नवयुवक , मोरीया नवयुवक, महालक्ष्मी नगर गणेश मंडळ , पटेल गणेश मंडळ , क्रांतीवीर शहीद भगतसिंग , मराठा समाज नवयुवक मंडळ, राजे संभाजी गणेश मंडळ आदि मंडळाच्या समावेश आहे. मिरवणूका म. गांधी पुतळा चार रस्ता जामामशिद मेन रोड तुप बाजार सोनार गल्ली मार्गे सुरु होत्या. यात साईबाबा मंडळ पटेल मंडळ महालक्ष्मी नगर मंडळ या मोठ्या मंडळांचा समावेश होता. जामा मशिद चौकात अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर तहसिलदार मनोज खैरनार नायब तहसीलदारा डॉ उल्हास देवरे वाय. डी. पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, डॉ टाटीया, अरविंद कुवर, अरुण चौधरी, श्याम जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर पाटील, मनलेश जयस्वाल, सुपडु खेडकरसह शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते
पारंपारिक वेशभुषेत सहभाग
अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी फेटा बांधून पारंपारीक साडी नेसून मिरवणूकीत लेझीम सादर केली. अभिनव विद्यालयाच्या श्रींची विसर्जन मिरवणूक हातगाडीवर काढण्यात आली. या मिरवणूकीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे फलक व विविध रोपे असणार्या कुंडी हातगाडीवर ठेवण्यात आल्या होत्या. या विसर्जन मिरवणूकीत विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्यासोबत शिक्षक व शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुकांमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालांनी माखले होते. या मिरवणुकीत आ. चंद्रकांत रघुवंशी, विजय चौधरी,विक्रांत मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवथेच्या दृष्टीने पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत श्री विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. दुसर्या टप्प्यातील गणपतीचे विसर्जन अनंतचतुर्दशीला होणार आहे.