जामनेर तालुक्यात सर्वाधिक ८५. ४५ तर भुसावळ तालुक्यात सर्वात कमी ६७.९६ टक्के मतदान
जळगाव: जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी आज ७८.११ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील काही केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान झाले. जिल्ह्यातील ६७८ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रियेला सकाळी ७.३० वाजेपासून सुरवात झाली. पहिल्या दोन तासात ११.५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११.३० पर्यंत २२.२५ टक्के मतदान झाले. तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४८.३४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर एकुण ७८.११ टक्के मतदान झाले. यात जळगाव तालुक्यात ७८.४६ टक्के, जामनेर ८२.४५ , धरणगाव ७७.०७ , एरंडोल ७५.८६, पारोळा ७८.८५, भुसावळ ६७.९६, मुक्ताईनगर ८०.८१, बोदवड ७८.८१, यावल ७७.०३, रावेर ८१.९७, अमळनेर ७७.७७ , चोपडा ७७.४१, पाचोरा ७७.४८, भडगाव ७५.४३, आणि चाळीसगाव तालुक्यात ७९.२९ असे एकुण ७८.११ टक्के मतदान झाले आहे.
शेवटच्या दोन तासात वाढले मतदान
दुपारी ३.३० पर्यंत जिल्ह्यात ६६.४७ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या दोन तासात मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसुन आल्या. तर जळगाव तालुक्यातील कानळदा आणि शिरसोली येथे रात्री ८.१५ पर्यंत मतदान सुरूच होते.
दहा लाख मतदारांनी बजावला हक्क
जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतीसाठी १३ लाख ११ हजार ८४७ मतदार होते. त्यापैकि १० लाख २४ हजार ६८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ४ लाख ८६ हजार ५४ स्त्री तर ५ लाख ३८ हजार ५९५ पुरुष आणि इतर २ मतदारांचा समावेश आहे.