जळगाव। जिल्ह्यात या आठवड्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने उन्हाची तिव्रता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पूर्व हंगामी लागवडीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात अंदाजे 13 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पूर्व हंगामी लागवड झाले असून यावर्षी साडे चार लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड होईल अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुरेंद्र पाटील यांनी दिली.
दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांनी लागवड केली नाही. जिल्ह्यात केवळ 2.5 ते 3 टक्के कापूस लागवड झाली असून चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यात लागवडीचे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षी जिल्ह्यात 7 लाख 53 हजार 826 हेक्टरी संपूर्ण लागवड झाली होती. यावर्षी 7 लाख 26 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर संपूर्ण लागवड होण्याची शक्यता आहे. आतापर्यत जिल्ह्यात 7.5 मीमी पाऊस झाला आहे.