जिल्ह्यात 146 नवीन सज्जांची स्थापना होणार

0

जळगाव । तलाठी सज्जा कमी असल्याने एकाच सज्जावरुन चार ते पाच गावांचे कामकाज केले जाते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असते. तलाठींची संख्या वाढवून सज्जाची संख्या वाढावी अशी मागणी जनतेमधुन होत होती यावर शासनाने निर्णय घेतले असून नाशिक विभागीय मंडळात 689 नवीन सज्जे निर्माण करण्यात येणार आहे. तर 115 नवीन महसूल मंडळे निर्माण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात 146 तलाठी सज्जे निर्माण होत असून 24 महसूल मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. शासन निर्णयात दिलेल्या सुचनेनुसार तलाठी सज्जा, महसूल मंडळे स्थापन करण्यात येत आहे.