जळगाव । महाराष्ट्रातील बहुतेक शेती ही पर्जन्यमानावर अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील पर्जन्यमानावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन यांच्या माध्यमातुन जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना जाहिर केलेली आहे. या योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टपेक्षा अधिक शेततळे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कृषि विभागाच्या सर्व अधिकार्यांची आढावा बैठक घेऊन शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. यासाठी कृषि विभागाच्या अधिकार्यांनी शेतकर्यांच्या भेटी घेऊन शेतात शेततळे तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. याचाच परिणाम म्हणून जिल्हयात अल्प कालावधीतच 1 हजार 585 शेततळी पुर्ण झाली आहे. तर 60 शेततळयांची कामे सुरु आहेत.
शेततळ्यामुळे लवकरच पाणीसाठा
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतंर्गत जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 647 शेततळी अमळनेर उपविभागात झाली आहे. तर त्या खालोखाल पाचोरा उपविभागात 588, जळगाव उपविभागात 404 शेततळी झाली आहे. तर सर्वाधिक शेततळी 310 अमळनेर तालुक्यात झाली असून जळगाव-106, भुसावळ-64, बोदवड-21, यावल- 84, रावेर-41, मुक्ताईनगर-88, चोपडा-51, एरंडोल-66, धरणगाव-47, पारोळा-173, चाळीसगाव-188, जामनेर-232, पाचोरा-130 व भडगाव तालुक्यात 38 शेततळी पूर्ण झाली आहे. या शेततळ्यांमुळे जिल्हृयात मोठया प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार असून शेतकर्यांना पाण्याअभावी पिकांच्या होणार्या नुकसानीतून दिलासा मिळणार आहे. तसेच या शेततळ्यांमुळे शेतानजीकच्या विहिरींच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्हयातील बहुतेक शेतकरी या योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना दृष्काळापासून काही प्रमाणात मुक्ती मिळण्यास मदत होत आहे. यासाठी सन 2016-17 या वर्षामध्ये एकूण 2 कोटी 76 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच या आर्थिक वर्षात (2017-18) 4 कोटी 88 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले असून त्यापैकी 4 कोटी 65 लाख रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले आहे.
शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस जिल्हयातील शेतकर्यांनी मोठया संख्येने उत्सफुर्त प्रतिसाद दिला असून 5 हजार 640 शेतकर्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी 4 हजार 740 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून 3 हजार 333 शेतकर्यांच्या अर्जांना समितीने मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार जिल्हयात 2 हजार 664 शेततळ्यांची कामे सुरु करण्याचे आदेश कृषि विभागाने दिले आहे. 1 हजार 585 शेततळी पुर्ण झाली आहे. तर 60 शेततळयांची कामे सुरु आहेत.