रत्नागिरी – पावसाळ्यात उद्भवणार्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारी हानी टाळण्यासाठी 254 गावांचा आपत्ती निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने जोखीमग्रस्त असलेली गावे, किनारी भागात उधाणाच्या भरतीने बाधित होेणारी गावे, नदी किनार्यालगत असलेल्या पूरसदृश आणि भूस्खलनचा धोका असलेल्या 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
पावसाळ्यात उद्भवणार्या आपत्तीमध्ये प्रशासनाने सतर्कता बाळगताना तालुका आपत्ती निवारण आराखडे तयार करण्यात आले होते. यामध्ये नदीतील गाळ काढणे, नदी किनारी वसलेल्या गावात आरोग्याच्या समस्या उद्भवू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करणे, किनारी गावात धोेकादायक किनार्यांवर खबरदारीच्या उपाय योजना करणे आदींचा समावेश करण्यात आला होता. मंगळवारी जिल्हा प्रशासनाची जिल्हा आपत्ती निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाने कार्यरत करण्यात आलेल्या 24 तास कार्यरत नियंत्रण कक्षाची माहिती देण्यात आली.
आरोग्याच्या समस्यांबाबत सूचित
नियंत्रण कक्षाकडून पावसाळ्यात निर्माण होणार्या नैसर्गिक आपत्तीत करण्यात येणार्या उपायोजनांबाबत माहिती देण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील 254 गावांचा आपत्ती निवारण आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये आरोग्याच्या जोखीमग्रस्त 84 गावांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात येणारी खबरदारीबाबत सूचित करण्यात आले. पावसाळ्यात प्रामुख्याने पाणी दूषित झाल्याने आरोग्याच्या समस्या उद्दभवतात. ही समस्या डोंंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावात प्रामुख्याने जाणवते. अशा गावात आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
आपत्ती निवारण केंद्रे उभारण्याच्या सूचना
किनारी गावात उधाणाच्या भरतीने बाधित होणार्या 104 गावात खबरदारीच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये धोका प्रवणच्या किनार्यावर आपत्ती निवारण यंत्रणेची सज्जता करण्यात येणार आहे. भूूरस्खलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात 23 गावे धोकादायक असून यासाठी आपत्ती निवारण केंद्रे उभारण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.