जिल्ह्यात 23 गावांसाठी 12 टँकर्सने पाणीपुरवठा

0

जळगाव । गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने यावर्षी पाणींटंचाईच कमालीचा फरक पडला आहे. याच दिवसाला गेल्यावर्षी 100 गावांसाठी 85 टँकरचा टप्पा पार पडला होता. मात्र यावर्षी 23 गावांसाठी 12 टँकरने पाणी पुरवठा होत आहे. सर्वाधीत टँकरने पाणी पुरवठा अमळेनर तालुक्यात होत असून दरवर्षी अमळनेर भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात 17 गावांना 7 टँकर, पारोळा 4 गावांना 3, भुसावळात 1 गाव आणी जळगाव 1 असे एकुण 23 गावांना 12 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही उपाययोजनांचा अहवाल सादर केला असून त्या अहवालाद्वारे विहीर अधिग्रहण, तात्पूरती पाणी पुरवठा योजना, नविन विंधन कुपनलिका घेणे, नविन विंधन विहीर घेणे, विहीरी खोलीकरण करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती अशी कामे केली आहे. यात नविन विंधन विहीर घेण्यात 19 गावांसाठी 37 विहिरी घेतल्या, 91 गावांतील 86 विहीर अधिग्रहित केले आहे. तर नविन कुपनलिका 3 गावांसाठी 4 असे कामे करण्यात येत आहे.