जिल्ह्यात 99 सरपंचपदासाठी 496 अर्ज

0

पुणे । जिल्ह्यात होऊ घातलेल्या 99 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 496 अर्ज वैध ठरले आहेत. तर सदस्य पदासाठी 2 हजार 464 अर्ज वैध ठरले आहेत. मंगळवारी (दि. 12) दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छाननी झाली. त्यात सरपंचपदाचे 11 तर, सदस्यपदासाठीचे 47 अर्ज बाद ठरले. येत्या 26 डिसेंबरला 99 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी आणि फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. पुणे जिल्ह्यातील दुसर्‍या टप्यातील 99 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 11 डिसेंबर ही शेवटची तारीख होती.

जुन्नरमध्ये 98 अर्ज
सरपंच पदासाठी जुन्नर 98, आंबेगाव 46, खेड 8,शिरूर 5, मावळ 37, मुळशी 63, हवेली 61, वेल्हे 14, भोर 31, दौंड 9, बारामती 109, पुरंदर 15 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. सदस्य पदांसाठी जुन्नर 457, आंबेगाव 194, खेड 75, शिरूर 45, मावळ 191, मुळशी 197, हवेली 372, वेल्हे 38, भोर 83, दौंड 47, बारामती 700, पुरंदर 65 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

सदस्य पदासाठी 2 हजार 464 अर्ज वैध
सरपंचपदासाठी 507 अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत 496 अर्ज वैध ठरले. तर सदस्य पदासाठी 2 हजार 496 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 47 अर्ज बाद ठरले आहेत. 2 हजार 464 अर्ज वैध ठरली. बारामती तालुक्यातील 16 सरपंचपदासाठी 103 अर्ज वैध ठरली आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर आहे. तसेच, त्याच दिवशी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मतदान 26 तर मतमोजणी 27 डिसेंबरला होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.