जिल्ह्याभरात ईद उत्साहात साजरी

0

जळगाव। मु स्लीम समुदायाचा पवित्र रमजान महिना सुरु होता. सोमवारी 26 रोजी रमजान महिन्याची सांगता रमजान ईद साजरी करुन झाली. जिल्ह्याभरातील मुस्लीम समुदायाला शुभेच्छा देण्यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष सरसावले होते. त्यांच्यातर्फे मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रमजान निमित्त अमन व शांती तसेच चांगल्या पावसासाठी प्रार्थना करण्यात आली. सर्व धर्म समभाव असल्याचे ईद निमित्त दिसून आले. रमजान निमित्त बांधवांना खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले होते.

एरंडोल येथे ईद उत्साहात
एरंडोल। मुस्लीम समुदायाचा पवित्र रमजान महिनाच्या शेवटचा दिवस रमजान ईदने सर्वत्र साजरा करण्यात आला. एरंडोल शहरात रमजान ईद उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली. शिवाजी नगर परिसरातील इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामुहिक नमाज पठाण केले. शहरातील धरणगाव चौफुली, शांतारामदादा चौक परिसरात, विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार डॉ.सतिश पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रवींद्र महाजन, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, राजेंद्र शिंदे, डॉ.नरेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश महाजन, प्रा.शिवाजीराव अहिरराव, प्रकाश चौधरी, संजय महाजन, मधुकर देशमुख, डॉ.राजेंद्र देसले, युवासेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, संदीप पाटील, चिंतामण पाटील, गजेंद्र महाजन, प्रशांत महाजन, संजय चौधरी, प्रमोद महाजन, विजय ठाकूर यांचेसह सर्वच राजकीय,सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच अनिलभाऊ चौधरी परिवर्तन मंचचे सदस्य उपस्थित होते.

दिपक राजपूत यांनी दिल्या शुभेच्छा
पाचोरा। लोहारा-आंबेवडगाव गटातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत यांनी रमजान निमित्त मुस्लीम बांधवांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

पाचोरा येथे रमजान ईद
पाचोरा। मुस्लीम समाजबांधवातर्फे सोमवारी 26 रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली. शहरातील इदगाह मैदानावर दुवाची नमाज पठण झाल्यावर मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पाचोरा पोलीस उपअधीक्षक केशवराव पातोंड, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, नगरसेवक वासुदेव महाजन,कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.अविनाश भालेराव, जिल्हा आरोग्य सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी, अनिल पाटील, नंदु सोनार, माजी नगरसेवक गणेश पाटील, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, दिनकर देवरे, बंडू चौधरी, संदिप महाजन, अनिल येवले आदी उपस्थित होते. गुलाब पुष्प देउन मुस्लिम बांधवांनाचे स्वागत केले. यावेळी महसूल विभाग प्रमुख तहसीलदार कापसे प्रथमच उपस्थित राहिले होते.

अडावद येथील पिंटू सेठ मित्र परिवारातर्फे कार्यक्रम
अडावद। पिंटू सेठ मित्र परिवार हे नेहमी जातीय सलोखा अबाधीत रहाण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात. गेल्या वर्षी या परिवाराने मुस्लिम बांधवांसाठी ईफ्तार पार्टी आयोजन केले होते. ईफ्तार पार्टीत गावातील व तालुक्यातील बहुसंख्य समाजबांधवांनी हजेरी लावली होती. या वर्षी या परिवाराने अडावद गावातील मुस्लिम बांधवांसाठी नमाज अदा करून परत येत असतांना काजू, बदाम, गुलाब, फुल देऊन स्वागत केले. गळा भेट करुन ईदच्या शुभेच्छा दिल्या. परिवारातील पिंटू सेठ, जिल्हा परिषद आरोग्य सभापती दिलीप युवराज पाटील, सरपंच भारती महाजन, चंद्रकांत पाटील, उमेश कासट, महेश दहाड, संजय देशमुख, आलोक बाहेती, सतिष दहाड, राजू बाहेती, देवेंद्र दहाड, पंकज पाटील, सचिन महाजन, हरीश पाटील, हनुमंत महाजन, सुनील महाजन, विक्की देशमुख, राजेश देशमुख, शांताराम पाटील, डिगंबर पाटील, चंद्रशेखर पाटील, राकेश पाटील, दिनकरराव देशमुख, आसाराम कोळी, साखरलाल महाजन, सपोनि जयपाल हिरे, पीएसआय पंकज शिंदे आदींनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम समुदायाला सर्वपक्षीय शुभेच्छा
चोपडा । ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आयतर्फे वेगवेगळा पेंडॉल उभारण्यात आले होते. सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट घेऊन औपचारिक चर्चा केली. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, डॉ.सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरिष पाटील, आत्माराम माळके, गोरख पाटील, एम.व्ही. पाटील, दिपक जौरी, राजेंद्र बिटवा, महेंद्र धनगर, अमृतराव सचदेव, भैय्या पवार, विकास पाटील, राजाराम पाटील, नरेश महाजन, दिपक चौधरी, पी.एम. पाटील, सुकलाल कोळी, राजेंद्र जैस्वाल, धीरज गुजराथी, रविंद्र पवार, जगदीश मराठे, दिपक माळी, जगन्नाथ पाटील, संजीव बाविस्कर, सुरेश पाटील, जिवन चौधरी, अतुल ठाकरे, महेंद्र बोरसे, संजय कानडे, डॉ. रविंद्र पाटील, प्रविण गुजराथी, राजेंद्र भाटीया, रमेश शिंदे, नरेंद्र पाटील, गजेंद्र जयस्वाल, जे.के. थोरात, मनोहर बडगुजर, तुषार पाठक, नितीन माळी, पंकज पाटील, हारूण मिस्तरी, ए. आर. काझी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.