जिल्ह्याला मोठा दिलासा: चार महिन्यात प्रथमच सर्वात कमी रुग्णांची नोंद

0

जळगाव: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जळगाव जिल्ह्यात अक्षरशः कहर केला आहे. मात्र मागील महिन्याभरापासून रुग्णसंख्येत मोठी घट होतांना दिसत आहे. नवीन बांधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. दरम्यान रविवारीमागील चार ते साडेचार महिन्यातील सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी जिल्हयात फक्त 76 रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे आज रविवारीतब्बल 438 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या कैक पटीने अधिक आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा कहर आता ओसरतांना दिसत आहे. मात्र खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केली जात आहे.