जळगाव: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा जळगावात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने 53 हजारांचा टप्पा ओलांडला त्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील रुग्ण संख्येत घट होत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान एप्रिलनंतर म्हणजे गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दिवसभरात 18 नवीन बधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 68 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 571 वर आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या 53550 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1272 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 51707 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.