जिल्ह्यावर वाढत्या गुन्हेगारीची ‘संक्रांत’

0

किशोर पाटील
उपसंपादक,

नवीन वर्षातील पहिलाच मराठी सण मकरसंक्रात. असे म्हटले जाते की पाणीपतच्या युध्दात मकरसंकातीच्या दिवशीच आपला पराभव झाला होता. तेव्हापासून संक्रात म्हणजे संकट अशा अर्थाने शब्द प्रचलित झाला. नवीन वर्षाची सुरुवातच घरफोड्या, चोर्‍या, खून, गोळीबार अशा घटनांनी झाली. म्हणजेच जिल्ह्यावर वाढत्या गुन्हेगारीची संक्रात असून बिनधास्तपणे भरदिवसा गोळीबार, खून, चोर्‍या, दरोडा करण्याइतपत हिंमत करणार्‍या गुन्हेगारांवर संक्रात येणार कधी? असा प्रश्‍न मकरसंक्रातीच्या निमित्ताने प्रत्येक जिल्हावासिय नागरिकाला पडल्याशिवाय राहिला नाही. वाढती गुन्हेगारी ही जिल्ह्यातील सध्यस्थितीतील गंभीर बाब आहे. दुष्काळावर शासनाने पर्याय सुचविले, मात्र गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्यापध्दतीने कुठल्याही उपाययोजना अथवा कामगिरी पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या काळात पोलीस कर्मचार्‍यांकडून दिसून येत नाहीये. नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस असुरक्षित असल्यानेय यामुळे जिल्हावासिय प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिल कसा? यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक दहशतीत जीवन जगत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक वर्षात चोर्‍या, घरफोड्यांची तर नागरिकांना सवय झाली आहेत. अर्थात याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. मात्र याचा अर्थ असाही होत नाही पोलिसावर सुरक्षेची जबाबदारी नाही. अहो चोर बिनधास्तपणे एक दिवसाआड शहरात चोर्‍या, घरफोड्या करताहेत. पहाटे चार वाजता दरोडा पडला, ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले. मग याला आता नागरिकांची बेपवाई म्हणायची की, पोलिसांचा कामचुकार पणा. खर सांगायच झाले तर अर्थात खाकीचा वचकच गुन्हेगारांवर राहिला नाही. जो दरारा पाहिजे. तसा दरारा पोलिसांचा नाहीये.त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढणारच हेही तेवढेच खरे आहे. वाढती गुन्हेगारी ही सद्यस्थितीतील जिल्ह्यातील गंभीर बाब आहे. ‘हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे..’ असाच प्रकार आहे. दरवेळी नवीन पोलीस अधीकारी जिल्ह्यात येतात. त्यामुळे पण केवळ नागरिकांसाठी नवीन असतात. गुन्हेगारांसाठी ते जुनेच असतात. ‘तोच राम तोच गडी’ याप्रमाणे पोलीस प्रशासनाचा कारभाराचीही आता नागरिकांना सवय करुन घ्यावी लागेल. एखादी अधिकारी आला, त्या अधिकार्‍याने आल्यावर एखादी थातूर मातून कारवाई केली लगेच त्याला चित्रपटाप्रमाणे दबंग, सिंघम अशी विशेषणे लागतात. आपण त्याला डोक्यावर घेतो, अरे पण आपण कुणाला आणि कशासाठी डोक्यावर घेतोय हे समजून घेतले पाहिजे. त्याला डोक्यावर घेण्याइतपत कामगिरी तर करु द्या. मग घ्या की…आता मुद्यावर येवू दत्तात्रय शिंदे यांच्याबाबतही खूप शिस्तप्रिय अधिकारी असल्याचे ऐकण्यात आले. मात्र केवळ कर्मचारी धाकात राहिले म्हणजे खूप मोठी कामगिरी करताहेत असे होत नाही. अहो जिल्ह्यात गुन्हेगारी करणारा चोर, गुंड धाकात राहिला पाहिजे तो खरा अधिकारी…साहेबांचा धाक फक्त कर्मचार्‍यांवर… चोर, गुन्हेगारांवर नाही, अशी स्थिती आहे. थेट जीवे मारण्यापर्यंत मारहाण करण्यार्‍यांची हिंमतच होते, कशी रस्त्यावर अडवून मारहाण करुन ऐवज लांबविण्याचे प्रकार घडतात कसे, सुपारी घेवून गोळीबारासारखा प्रकार घडतो. त्यामुळे जळगावला बिहार म्हटले कुठे? अहो आता बिहारची तर गुन्हेगारी पार्श्‍वभूमि चांगली असेल मात्र जळगावची दिवसेंदिवस वाईट होत चाचली आहे. चोरी, दरोडाच काय पण कुणावर हात उचलताना ही चड्डीत लघवी झाली पाहिजे. हे चित्रपटाव्यतिरिक्त जळगावकरांना कधी जळगावातही पहायला मिळेल की नाही? देवजाणे. पोलीस अधीक्षक साहेब अवैधधंदे संपवा त्याच्याशी दुमत नाही पण आधी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावा. गुन्हेगारी नियंत्रणात नाही तर समूळ नष्टच झाली पाहिजे. कर्मचार्‍यांना शिस्त लावा, त्यांना धाकात ठेवा याबद्दल काही म्हणणे नाही मात्र त्यांना पारदर्शक कारवाईसाठी हिंमत, पाठबळही द्या. कर्मचारी काम का करत नाहीये, याची कारणे शोधा. त्याला खाकीची लाज वाटू देवू नका, त्याच्यात वर्दीचा अभिमान निर्माण करा, कामगिरीसाठी आत्मविश्‍वास भरा. पोलीस अधीक्षक साहेब आपण मकरसंक्रातीच्या दिवशी ती समूळ नष्ट करण्याचा संकल्प करा, अन् त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही करा. तेव्हाच तुम्हाला नागरिक डोक्यावर घेतील..एवढेच