जिवंत असताना मृत असल्याचे समजून घरी नेला मृतदेह

0

आश्‍चर्यांचा धक्का ; मेहरुणमधील प्रकराची घटनेची दिवसभर चर्चा

जळगाव : मृत व्यक्ती जिवंत होतो…बसला ना धक्का.. असाच प्रकार शनिवारी शहरात समोर आला. गैरसमजुतीतून नातेवाईकांनी इसम प्रत्यक्षात जिवंत असताना ती मृत झाल्याचे समजून जिल्हा रुग्णालयात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घरी हलविला. अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना जी मृत असल्याचे समजून मृतदेह आणला ती व्यक्ती समोरुन चालत आल्याने एकच गोंधळ उडाला. खात्री झाल्यावर नातेवाईकांनी पुन्हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

जिल्हा रुग्णालयाच्या भींतीजवळ शनिवारी सकाळी साडे दहा वाजता 60 वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरिक्षक संदीप आराक व सुनील जोशी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. मृत व्यक्तीचे नातेवाईक मेहरुणमधील जोशी वाड्यात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस तेथे पोहचले.

…अन् मृत जिवंत पाहताच आश्‍चर्यांचा धक्का
पोलिसांच्या माहितीनुसार अमीर शेख हा तरुण मृतदेह जिल्हा रुग्णालयात आला. व त्याने मृत व्यक्ती नाजीम शेख अहमद आहेत असून नात्याने मामा असल्याचे सांगून ओळख पटविली. मृतदेह मेहरुणमधील जोशीवाड्यात घरी नेण्यात आला. अंतिम संस्काराची तयारी सुरु असताना प्रत्यक्षात नाजीम शेख समोरुन चालत आले. त्यांना पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नाजीम शेख यांची पत्नी व मुले सोडून गेल्याने 20 वर्षापासून त्यांची मानसिकस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे ते सतत बाहेरच असतात, असे नातेवाईकांनी सांगितले.

नोंद करुन पोलिसांच्याही अडचणी वाढल्या
पोलिसांनी मृत व्यक्ती म्हणून नाजीमचीच जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली. प्रत्यक्षात ती जीवंत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनाही अडचणी वाढल्या असून कागदपत्रांमध्ये कुठलीही फेरफार करता येत नसल्याने याच विषयावर उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात चर्चा सुरु होती.