जिवंत कुत्र्याच्या अंगावरून बनवला रस्ता

0

आगरा: विकासाच्या नावाखाली रस्तेबांधणी करताना उत्तर प्रदेशमध्ये असंवेदनशील प्रकार पहायला मिळतो. आग्रा येथील फतेहपूर रोडवर रस्तेबांधणी करताना कर्मचाऱ्यांनी चक्क जिवंत कुत्र्याच्या अंगावर रस्ता बनवला. आरपी इन्फ्रावेन्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी या रस्त्याचे काम पाहात होते. काम सुरू असलेल्या रस्त्यावर एक बेवारस कुत्रा झोपला होता. संवेदनाहीन कर्मचाऱ्यांनी या कुत्र्याला हटकन्याचीही तसदी घेतली नाही.

कंपनीस नोटीस
खडी, वाळू, सिमेंट आदी गोष्टींचा वापर करत या कुत्र्याच्या शरीरावरच पक्का रस्ता बनविण्यात आला. इतकेच नव्हे तर, गाढलेल्या कुत्र्याच्या अंगावरून रोडरोलरही फिरवाला. त्यामुळे कुत्र्याचा जमीनीखाली दबून मृत्यू झाला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा हा असंवेदनशीलपणा पाहून स्थानिकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या तपासावेळी बांधलेला रस्ता खोदून पाहिले असता खरोखरच कुत्र्याचे शव मिळाले. या प्रकरणी पीडब्ल्युडीने रस्तेबांधणी करणाऱ्या या कंपनीस नोटीस पोठवली आहे.

पोलिसांत तक्रार
ताजगंज पोलीस ठाणे परिसरातील रस्त्याचे बांधकाम समोवारी (११ जून) रात्री सरू होते. हे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांनी कुत्र्याच्या शरीरावरही लोकांनी खडी, डांबर आणि इतर साहित्य ओतले. इतकेच नव्हे तर वरून रोड रोलरही फिरवला. सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांच्या ध्यानात हा प्रकार येता एकच खळबळ उडाली. दरम्यान, घटनास्थळी काही हिंदू संघटनांचे लोकही जमा झाले. जमा झालेल्या लोकांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर आपला राग काढला आणि पोलिसांत तक्रार दिली.