‘जिवलग मित्र गमावला’; मंत्री धनंजय मुंडेंकडून कुंदन ढाके यांना श्रद्धांजली

0

जळगाव: सिध्दीविनायक गृपचे चेअरमन आणि वृत्तपत्र क्षेत्रात मोठे नाव असलेले दै.जनशक्तीचे मुख्य संपादक कुंदन ढाके यांचे आज सोमवारी २८ रोजी निधन झाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ‘अत्यंत सामान्य परिस्थितीतून उभा राहिलेला, धडपड्या जिवलग मित्र आज अचानक आमच्यातून निघून गेला… जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी ढाके कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे’.

स्व.कुंदन ढाके आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. व्यवसायाच्या निमित्ताने दोघांची ओळख होती.