जळगाव: भाजपकडून जिल्हा अध्यक्षपदासाठी रावेरच्या रंजना प्रल्हाद पाटील नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती भाजप सूत्रांकडून मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी भाजपात जोरदार चुरस सुरू असून लालचंद पाटील आणि मधुकर पाटील यांच्यात उपाध्यक्षपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी अद्याप नाव निश्चित होऊ शकलेले नाही.